बुलढाणा (Maharashtra State) : दिर्घ काळापासून स्थापित बुलडाणा जिल्हा कार्यकारिणी नव्याने गठीत करण्यासाठी दि.१५ जून २०२५ रोजी म.ज्यो. फुले उच्च प्राथमिक शाळा, मुठ्ठे ले आऊट, बुलडाणा येथील सभेत अमरावती विभागाचे उपाध्यक्ष आनंद गावंडे व मोहन बैलके यांच्या उपस्थितीत व सर्व बुलडाणा जिल्ह्यातील कलाशिक्षकांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
दि.२७ जुलै २०२५ रोजीच्या कलाभवन, पुणे येथील राज्य अध्यक्ष – नरेंद्र बाराई, राज्य उपाध्यक्ष- बलराम सावंत आणि राज्य सरचिटणीस – दिगंबर बेंडाळे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत बुलडाणा जिल्ह्याच्या या नवीन कार्यकारिणीस मान्यतेचे रितसर पत्र देण्यात आले.
नवीन बुलडाणा जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा अध्यक्ष संजय शेनफडरावं काकडे, उपाध्यक्ष- शिवनारायण आत्माराम गवई, गणेश सुखदेव अंभोरे, रविंद्र तुकाराम गावंडे, सचिव राम गोपाल जाधव, सहसचिव-यशवंत बाबूराव खाकरे, कोषाध्यक्ष-गजानन शिवाजी तांगडे, प्रसिद्धी प्रमुख समाधान क्षिरसागर शेजोळ, निलेश काशिराम बोरे, महिला सदस्या-कु.सुवर्णा देविदास तायडे, सौ.संध्या दत्ताराव चव्हाण, कु. योगीता सुधाकर देशमुख, कु. संगिता मधुसुदन पडघान, सल्लागार- संजय माधव गुरव, हेमंत वसंतराव खंडाळे, सुभाष रामकृष्ण देशमुख,विशेष सल्लागार- रमेश तुळशिराम राऊत (मुख्याध्यापक), नंदकिशोर अमृतराव बोडखे (मुख्याध्यापक) तालुका सदस्य लोणार- कैलास विठ्ठलराव कार्यदे, खामगांव- गजानन भास्कर ठाकरे, दे.राजा रावसाहेब सखाराम बनकर, नांदुरा संदीप शामराव इंगळे, बुलडाणा- प्रविण शामराव व्यवहारे, चिखली सुनिल पंजाबराव मोहोड, सिं. राजा- राहुल दिगंबर दोडके, संग्रामपुर- गोपाल शंकर काकड, शेगाव रविंद्र शंकर सावदेकर, मलकापुर-मनोज मोहनराव धनोकार, जळगांव जामोद तुळशिराम महादेव पाचपोर, मोताळा- प्रशांत रमेश बोरसे, मेहकर सचिन आत्माराम म्हस्के हे नवीन कार्यकारिणीत असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.