लाडकी बहीण योजना

ऑपरेटरच्या चुकीमुळे अनेक लाडक्या बहिणी 'निराधार'!

Ladki Bahin Yojana: ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘कागदमुक्त कारभार’ यांचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात शासकीय यंत्रणेतील त्रुटींमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फटका. आधार कार्डमधील चुकीच्या जन्म..

ऑपरेटरच्या चुकीमुळे अनेक लाडक्या बहिणी 'निराधार'!

Ladki Bahin Yojana

सिस्टीममधील घोळामुळे आधार कार्ड तूर्त स्थगित

ठाणे (Ladki Bahin Yojana ) : ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘कागदमुक्त कारभार’ यांचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात शासकीय यंत्रणेतील त्रुटींमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फटका बसत आहे. शहापूर तालुक्यात आधार कार्डमधील चुकीच्या जन्मतारखा, नावातील बदल आणि पत्त्याच्या विसंगतींमुळे ४५ वर्षांवरील अनेक महिला संजय गांधी निराधार योजना, रेशन, पेन्शन आणि इतर शासकीय लाभांपासून वंचित राहत असल्याचे समोर आले आहे.

सन २००८मध्ये आधार नोंदणी सुरू झाली, त्यावेळी अनेक (Ladki Bahin Yojana) ग्रामीण महिलांच्या वयाची नोंद ऑपरेटरकडून अंदाजाने करण्यात आल्याचा आरोप आहे. आता आधार कार्डावरील जन्मतारीख आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जन्मतारीख यामध्ये तफावत आढळत असल्याने लाभांचे अर्ज अडकत आहेत.

१९९०पूर्वी जन्मलेल्या अनेक (Ladki Bahin Yojana) महिलांची जन्मनोंद उपलब्ध नसल्याने त्यांना न्यायालयामार्फत ‘विलंबित जन्म नोंदणी’ प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ, खर्चिक आणि सर्वसामान्य महिलांच्या आवाक्याबाहेरची आहे. काही प्रकरणांमध्ये (Ladki Bahin Yojana) महिलांना आधी माहेरच्या नावाने वयाचे गॅझेट करून नंतर सासरच्या नावाने आधार बदलण्याचा सल्ला दिला जात असल्याचे सांगितले जाते. नाव आणि जन्मतारीख लागोपाठ बदलल्याने यूआयडीएआयच्या सिस्टीममध्ये संशय निर्माण होतो आणि संबंधित आधार कार्ड ‘होल्ड’वर जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. परिणामी, अनेक महिलांचे आधार कार्ड गेल्या काही महिन्यांपासून अडकून पडले आहे.

शहापूर तालुक्यातील पत्त्यांच्या नोंदींमध्येही मोठा घोळ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. टपाल विभागाने सन २०१३नंतर शहापूरचा जुना पिनकोड ४२१३०१ कल्याणसाठी वापरात आणला, तर शहापूरसाठी ४२१६०१ हा नवीन पिनकोड लागू झाला. मात्र आधार प्रणालीत हा बदल पूर्णपणे अद्ययावत न झाल्याने पत्त्यांमध्ये विसंगती निर्माण होत असल्याची तक्रार आहे. यामुळे बँकांचे एटीएम, विमा पत्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे परत जात असल्याचे नागरिक सांगतात.

संबंधित सामग्री

हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा सन्मान; मराठीतून मांडली महाराष्ट्राची विकासगाथा

हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा सन्मान; मराठीतून मांडली महाराष्ट्राची विकासगाथा

हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा सन्मान झाला. ‘लाडकी बहीण’, ‘शासन आपल्या दारी’, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि भारत-ब्रिटन संबंधांवर त्यांनी भाष्य केले.

Sep 10, 2026
₹1500 हप्ता कुणाला मिळणार, कुणाला नाही? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

₹1500 हप्ता कुणाला मिळणार, कुणाला नाही? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Aug 28, 2026
या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत 1500 रुपये...जाणून घ्या कारण!

या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत 1500 रुपये...जाणून घ्या कारण!

CM Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील ९२ लाख महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लडक्याबहिण योजना’तून वगळण्यात आले. ई-केआयसी अपूर्ण पात्रता दाखल केल्यामुळे त्यांचा १५०० रु. मासिक लाभ बंद करण्यात आला आहे.

Jul 14, 2026
लाडकी बहीण योजनेत मोठा धक्का: 80 लाख महिला अपात्र; पात्रांवर अन्याय नाही – फडणवीसांचे स्पष्टीकरण

लाडकी बहीण योजनेत मोठा धक्का: 80 लाख महिला अपात्र; पात्रांवर अन्याय नाही – फडणवीसांचे स्पष्टीकरण

राज्यातील चर्चेत असलेल्या *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने*मध्ये मोठी घडामोड समोर आली आहे.

Jun 02, 2026
लडकी बहीण योजनेत मोठा बदल; सरकारची ₹12,000 कोटींची बचत

लडकी बहीण योजनेत मोठा बदल; सरकारची ₹12,000 कोटींची बचत

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात बदल करून 68 लाख महिलांना अपात्र घोषित केल्याने सरकारला वार्षिक ₹12,240 कोटींची बचत होण्याची अपेक्षा आहे.

Apr 13, 2026