Adulteration Crackdown

‘भेसळ हा साधा गुन्हा नाही’; एकनाथ शिंदेंचे दूध-पनीर भेसळखोरांवर मकोका कारवाईचे निर्देश

दूध, पनीर आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत

‘भेसळ हा साधा गुन्हा नाही’; एकनाथ शिंदेंचे  दूध-पनीर भेसळखोरांवर मकोका कारवाईचे निर्देश

भेसळखोरांविरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचे निर्देश; कायदेशीर प्रक्रिया मजबूत करण्यासाठी विशेष लीगल टीम स्थापन करण्याचे आदेश

दूध, पनीर आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अशा भेसळखोरांविरोधात संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे ‘विकसित महाराष्ट्र 2047’ अंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी विभागाला निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेसळखोरीच्या मुद्द्यावर कठोर भूमिका मांडली.

अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणे हा केवळ सामान्य स्वरूपाचा गुन्हा नसून नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित गंभीर प्रकार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. विशेषतः लहान मुले मोठ्या प्रमाणात दूधाचे सेवन करत असल्याने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ गंभीर परिणाम घडवू शकते. बनावट पनीर तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

भेसळखोरांवर कठोर कायदेशीर कारवाईचे निर्देश

अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यक्तींविरोधात कोणतीही नरमाईची भूमिका घेऊ नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. भेसळखोरांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कारवाईदरम्यान अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याबाबतही त्यांनी सूचना केली. संबंधित आरोपींना कायदेशीर पळवाटा मिळू नयेत, यासाठी प्रकरणांची कायदेशीर बाजू भक्कम असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष लीगल टीम तयार करण्याचे आदेश

भेसळखोरीच्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन कारवाई सुरू झाल्यानंतर कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये, यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. नामवंत आणि ज्येष्ठ विधीतज्ज्ञांची मदत घेऊन या प्रकरणांसाठी तातडीने विशेष लीगल टीम स्थापन करावी, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, विधी व न्याय विभागाचे सचिव उदय शुक्ला तसेच अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026