शेतकरी कर्जमाफी आंदोलन

बच्चू कडूंच्या उपोषणाच्या पोस्टरची जोरदार चर्चा

Bachu Kadu: अमरावतीत शेतकरी कर्जमाफी आंदोलनात साथ देणाऱ्यांचा सन्मानार्थ बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या पोस्टरच्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

बच्चू कडूंच्या उपोषणाच्या पोस्टरची जोरदार चर्चा

(Bachu Kadu)

शेतकरी कर्जमाफी आंदोलनात साथ देणाऱ्यांचा सन्मान

अमरावती (Bachu Kadu) : शेतकरी व शेतमजुरांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून, यासंदर्भातील पोस्टर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. पोस्टरची चर्चा (बॉक्स) “जय श्रीराम! कब मिलेगा हिंदू किसान को दाम?” या ठळक घोषवाक्यासह प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे.

हे उपोषण शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये शेतकऱ्यांच्या न्यायासाठी प्रतीकात्मक चित्रण करण्यात आले असून, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे फोटोही झळकत आहेत. या पोस्टरमुळे आंदोलनाबाबत उत्सुकता वाढली असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

या उपोषणाबाबत स्पष्ट करण्यात आले आहे की, हे आंदोलन केवळ सरकारविरोधी नसून महाराष्ट्रातील शेतकरी व शेतमजुरांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आहे. कर्जमाफीबाबत शासनाचे आभार मानतानाच उर्वरित मागण्यांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी झालेल्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनात ज्यांनी ज्यांनी साथ दिली, उपोषणात सहभागी झाले, रस्त्यावर उतरून आंदोलन केले, आर्थिक मदत केली किंवा विविध स्वरूपात पाठिंबा दिला अशा सर्व शेतकरी, नागरिक व कार्यकर्त्यांचा या उपोषणादरम्यान सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यामुळे या आंदोलनाला केवळ मागण्यांचा स्वरूप न राहता कृतज्ञतेची जोडही मिळणार आहे. दरम्यान, पूर्वी जाहीर करण्यात आलेली रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, कार्यक्रम केवळ एकदिवसीय उपोषणापुरताच मर्यादित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या उपोषणाकडे केंद्रीत झाले आहे. एकंदरीत, (Bachu Kadu) बच्चू कडू यांच्या या आंदोलनाच्या घोषणेमुळे अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी प्रश्न ऐरणीवर आले असून, २७ मार्च रोजी होणाऱ्या या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

Dongarkada Rastaroko Andolan: महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केल्या नंतर प्रशासनाने पंचनामे करत असल्याने दि 6 ऑक्टोबर रोजी डोंगरकडा फाटा येथे नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रास्तारोको आंदोलन..

Oct 06, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026