MPSC Protest Pune

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील आंदोलनात विविध मागण्यांवरून तीन गट; हर्षवर्धन सपकाळ, संजय राऊत, शरद पवारांसह अनेक नेत्यांनी घेतली आंदोलकांची भेट

पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांमुळे आंदोलनात तीन गट निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यातच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आंदोलनस्थळी भेटी देण्यास सुरुवात केल्याने हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आहे की त्याला राजकीय वळण मिळत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांच्यापासून संजय राऊत यांच्यापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या आंदोलनात लक्ष घातले आहे. आता आज दुपारी ४ वाजता मनसेप्रमुख राज ठाकरे MPSC विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील हेदेखील आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. यामुळे पुण्यातील MPSC आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून सहभागी असलेले शरद पवार गटाचे रोहित पवार यांनीही राज्य सरकारला इशारा दिला आहे. पुणे शहर ठप्प होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी पुढील काळातील आंदोलनाची दिशा विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवर अवलंबून असल्याचे म्हटले आहे.

रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार, सीजेपीचे अभिजीत दिपके यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे पुणे शहर बंद ठेवण्याचा निर्णय विद्यार्थी आणि त्यांचे पालक घेऊ शकतात. पुणेकरांनी त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. ७ किंवा ८ ऑक्टोबरला राहुल गांधी पुण्यात येण्याची शक्यता असल्याचे सांगत, त्यावेळी सुमारे १ लाख विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा अंदाजही रोहित पवारांनी व्यक्त केला.

यावेळी विद्यार्थ्यांकडून पुणे बंद किंवा मुंबईतील मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा पर्याय अवलंबला जाऊ शकतो, असे रोहित पवार म्हणाले. आज राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम देत असल्याचा इशारा रोहित पवारांनी दिला.

नितेश राणेंच्या विधानाला रोहित पवारांचे प्रत्युत्तर

MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी रोहित पवारांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा आणि संघर्षाची भूमिका घ्यावी, मात्र विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, असे आवाहन केले होते. हे आंदोलन राजकारणाचा मंच नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

रोहित पवार हे आपले मित्र असून, भविष्यात ते कदाचित आपल्यासोबत मंत्रिमंडळात काम करू शकतात, असेही नितेश राणे यांनी म्हटले होते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र काम करण्याची भूमिकाही त्यांनी व्यक्त केली होती.

नितेश राणेंच्या या भूमिकेवर रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे हे आपले मित्र असल्याचे मान्य करताना, आपल्याला मंत्रीपदाची ऑफर देण्यापेक्षा त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवावेत, असे रोहित पवारांनी म्हटले.

सरकारविरोधात वातावरण तयार होत असल्यानेच नितेश राणे आपल्यासोबत काम करण्याची भाषा करत आहेत, असा दावा रोहित पवारांनी केला. याचा अर्थ सरकार जाणार असून पुढील सत्ता आमची येणार आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

नितेश राणेंनी धाडस दाखवून विरोधी बाकांवर बसावे आणि पुढे आमची सत्ता आल्यानंतर एकत्र काम करू, असे रोहित पवार म्हणाले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत नितेश राणे भरकटलेले दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली.

‘विद्यार्थ्यांचा प्रश्न राजकारणाचा विषय नाही’

विद्यार्थ्यांचा प्रश्न राजकारणाशी जोडला जाऊ नये, या नितेश राणेंच्या भूमिकेशी आपण पूर्णपणे सहमत असल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केले. सत्याग्रह आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आपलीही हीच भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, सत्ताधारी पक्षातील काही आमदारच या प्रश्नाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नये, अशी सूचना संबंधित आमदारांनाही नितेश राणेंनी करावी, असे ते म्हणाले.

दरम्यान, MPSC संदर्भातील विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांच्या मुळाशी असलेल्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत रोहित पवारांनी MPSC अध्यक्ष भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. MPSC संस्थेतील भ्रष्टाचाराची साफसफाई करण्याची मागणी नितेश राणे यांनी त्यांच्या सरकारकडे करावी, असेही त्यांनी म्हटले.

ही मागणी सरकारने मान्य करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले, तर आपल्यासह सर्व विद्यार्थी नितेश राणेंचे आभार मानतील, असे रोहित पवार म्हणाले.

तसेच नितेश राणे यांनी भविष्यात आपल्यासोबत मंत्री म्हणून काम करण्याबाबत केलेल्या विधानावरही रोहित पवारांनी सवाल उपस्थित केला. ‘आपण सोबत मंत्री बनण्याची’ भाषा करत असाल, तर याचा अर्थ तुम्ही भाजपला रामराम करण्याच्या तयारीत आहात, असे आम्ही समजायचे का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आज पाचवा दिवस असून, राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित भेटींसह रोहित पवारांच्या इशाऱ्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे आता लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026