Bhandara Permission

भंडारा-महाप्रसादासाठी आता परवाना बंधनकारक; विनानोंदणी आयोजन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

राज्यात धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या भंडारा व महाप्रसादासाठी आता अन्न व औषध प्रशासनाची नोंदणी किंवा परवानगी आवश्यक करण्यात आली आहे.

भंडारा-महाप्रसादासाठी आता परवाना बंधनकारक; विनानोंदणी आयोजन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

तुकाराम मुंढे यांच्या नव्या मार्गदर्शक सूचना; ऑनलाइन नोंदणीसाठी अवघे १०० रुपये शुल्क, कोल्हापुरात ९ अन्नसुरक्षा अधिकारी ठेवणार लक्ष

राज्यात धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या भंडारा व महाप्रसादासाठी आता अन्न व औषध प्रशासनाची नोंदणी किंवा परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. आवश्यक परवाना न घेता अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असून, परिस्थितीनुसार गुन्हाही दाखल होऊ शकतो. अन्नातून विषबाधेच्या घटना रोखणे तसेच स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे निकष सुनिश्चित करणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

श्रावण महिन्यापासून दिवाळीपर्यंत राज्यात विविध सण आणि धार्मिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल असते. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात या कालावधीत महाप्रसाद, भंडारा आणि जेवणावळींचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र, अशा कार्यक्रमांसाठी आयोजकांना आता अन्न व औषध प्रशासनाकडून अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अन्नपदार्थ तयार करताना आयोजकांनी स्वच्छ आणि निर्जंतुक पाण्याचा वापर करावा, भांडी स्वच्छ ठेवावीत आणि अन्न तयार करणे व वितरण करताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन FDAने केले आहे. तसेच मुदत संपलेले किंवा नाशवंत पदार्थ वापरणे टाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात भंडारा, महाप्रसाद आणि जेवणावळींच्या ठिकाणांची तपासणी नऊ अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान अस्वच्छता किंवा अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आयोजकांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे यांनी दिली.

काय आहे नवा नियम?

FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भंडारा आणि महाप्रसादाच्या आयोजनासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नियमानुसार मोठ्या कार्यक्रमांमध्ये अन्नवाटप करण्यापूर्वी आयोजकांनी अधिकृत नोंदणी किंवा आवश्यक परवाना घेणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

अवघ्या १०० रुपयांत ऑनलाइन नोंदणी

भंडारा आणि महाप्रसाद आयोजकांसाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. आयोजक ऑनलाइन पद्धतीने केवळ १०० रुपये शुल्क भरून नोंदणी करून आवश्यक परवाना मिळवू शकतात.

सण-उत्सवांच्या काळात राज्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंडारा आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. अशा कार्यक्रमांमध्ये हजारो भाविक सहभागी होत असल्याने अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत अधिक दक्षता घेण्यासाठी FDAने हा निर्णय घेतला आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026