पुणे (Indian Astronomer Research) : भारतीय खगोलशास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील एका आंतरराष्ट्रीय संशोधन पथकाने अंतराळ संशोधनात अत्यंत महत्त्वाची आणि विस्मयकारक कामगिरी केली आहे. पुण्यातील प्रतिष्ठित 'आयुका' संस्थेतील खगोलशास्त्रज्ञ डॉ. राहुल शर्मा आणि प्रा. चांद्रेयी मैत्रा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 'ई-रासू जे०६०८' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोन मृत ताऱ्यांची अत्यंत वेगवान प्रणाली शोधून काढली आहे. ही (Indian Astronomer Research) खगोलीय प्रणाली अवकाशातील गुरुत्वीय लहरी आणि ताऱ्यांच्या आयुष्याचा शेवट समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
दर 374 सेकंदांनी एक्स-रे सिग्नल!
या (Indian Astronomer Research) संशोधनातील सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे या मृत ताऱ्यांची अभूतपूर्व गती आणि त्यांच्यातील परस्परसंवाद. या दोन्ही ताऱ्यांमधील अंतर अत्यंत कमी असून, अवघ्या 6 मिनिटांत 374 सेकंदहे दोन्ही तारे एकमेकांभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. अंतर खूपच कमी असल्याने एका ताऱ्यातील पदार्थ थेट दुसऱ्या ताऱ्यावर प्रवाहित होत आहे. या प्रक्रियेमुळे दर 374 सेकंदांनी अंतराळात एक्स-रेचा अत्यंत तेजस्वी सिग्नल निर्माण होत आहे. या ताऱ्यांची कक्षा वेगाने आकुंचन पावत असून, ते गुरुत्वीय लहरींच्या रूपात सातत्याने स्वतःची ऊर्जा गमावत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
नासा अन् आंतरराष्ट्रीय वेधशाळांच्या डेटाचा वापर
या (Indian Astronomer Research) ऐतिहासिक संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांनी अत्याधुनिक दुर्बिणींचा आणि दीर्घकालीन डेटाचा वापर केला. आईन्स्टाईन प्रोब आणि नासाच्या दुर्बिणीच्या ताज्या निरीक्षणांचा यात समावेश आहे. वेधशाळेच्या सुमारे साडेतीन वर्षांच्या डेटाचा सखोल अभ्यास करून या प्रणालीचा शोध लावला गेला. भविष्यात अंतराळावर आधारित गुरुत्वीय लहरी शोधणाऱ्या उपकरणांसाठी 'ई-रासू जे०६०८' ही प्रणाली एक अत्यंत महत्त्वाचे जागतिक लक्ष्य ठरणार आहे.
"खगोलशास्त्राच्या दृष्टीने ऐतिहासिक टप्पा!"
या (Indian Astronomer Research) महत्त्वपूर्ण शोधावर प्रतिक्रिया देताना आयुका पुणे येथील खगोलशास्त्रज्ञ प्रा. चांद्रेयी मैत्रा म्हणाल्या की, "eRASSU J0608 या प्रणालीचा शोध हा अत्यंत दुर्मिळ आणि रोमांचक आहे. अवघ्या सहा मिनिटांत एकमेकांभोवती फिरणारे हे श्वेत बटू तारे गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी एक अनोखी प्रयोगशाळा ठरतील. भारतीय शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन जगासमोर आले, ही आपल्या देशासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे."