लिगो इंडिया प्रकल्प

लिगो इंडियामुळे देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळणार: डॉ. मोहंती

LEGO India Project: हिंगोलीमध्ये लिगो इंडिया प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. या प्रकल्पामुळे भारत गुरुत्वीय तरंग संशोधनात आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य ठरण्याची अपेक्षा आहे.

लिगो इंडियामुळे देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळणार: डॉ. मोहंती

LEGO India Project

प्रकल्पाच्या नागरी व निर्वात पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन

हिंगोली (LEGO India Project) : हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या लिगो इंडिया या देशातील महत्त्वाकांक्षी व अत्याधुनिक वैज्ञानिक प्रकल्पामुळे देशाला आंतरराष्ट्री‌य पातळीवर नवी ओळख मिळणार असल्याचे प्रतिपादन प्रमुख अतिथी अणु ऊर्जा आयोगाचे सचिव तथा  परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी केले.  दुधाळा येथील लिगो इंडिया प्रकल्पाच्या नागरी (सिव्हिल) व निर्वात पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन आज गुरुवार (दि.२३) रोजी त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. 

या (LEGO India Project) प्रसंगी प्रकल्पाच्या साईट ऑफिस इमारतीचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, डीसीएसईएमचे संचालक के. महापात्रा, आरआरसीएटीचे संचालक व्ही. पी. भनागे, आयपीआरचे संचालक डॉ. तपस गांगुली तसेच आययूकेए, पुणेचे संचालक आर. श्रीआनंद यांच्यासह संबंधित संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लिगो इंडिया प्रकल्प (LEGO India Project) हा गुरुत्वीय तरंगांचा शोध व अभ्यासासाठी उभारला जाणारा जागतिक दर्जाचा प्रकल्प असून, या माध्यमातून अवकाशातील सूक्ष्म कंपनांचा अभ्यास करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे ४ किलोमीटर लांबीचे ‘एल’ आकारातील दोन भुयारी मार्ग उभारण्यात येणार असून, त्यामध्ये अत्याधुनिक लेसर तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. अत्यंत उच्च दर्जाच्या निर्वात प्रणालीमुळे अत्यल्प पातळीवरील हालचालींचे अचूक मोजमाप शक्य होणार आहे.

भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग व विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्थांच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणी होत आहे. हा (LEGO India Project) प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारत गुरुत्वीय तरंग संशोधनात अग्रगण्य देशांच्या यादीत स्थान मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोलीची  जागतिक स्तरावर विशेष ओळख असलेल्या 'यलो गोल्ड' हळदीचे बॉक्स प्रमुख अतिथींना भेट दिले.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
Nobel Prize 2026: हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना रसायनशास्त्रातील नोबेल; ‘मिरर इमेज’चे गूढ उकलले

Nobel Prize 2026: हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना रसायनशास्त्रातील नोबेल; ‘मिरर इमेज’चे गूढ उकलले

2026 चा रसायनशास्त्रातील नोबेल हेन्री कागन आणि केन्सो सोई यांना जाहीर; होमोचिरॅलिटीच्या गूढावर केलेल्या संशोधनाचा औषधनिर्मितीला मोठा फायदा.

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026