मंगरूळपीर तालुक्यातील मोहगव्हाण येथे नुकसानग्रस्त पिकांची पाहणी
मंगरूळपीर (CM Devendra Fadnavis) : दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचा शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार अशी माहिती मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गुरुवार ता.२४ रोजी तालुक्यातील मोहगव्हाण येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी फडणवीस यांनी केली,यावेळी ते बोलत होते.
पावसाने तब्बल दीड महिन्याहून अधिक काळ दडी मारल्याने तालुक्यातील खरीप हंगामावर ओढवलेल्या संकटाची तीव्रता आता थेट सरकार दरबारी पोहचल्याने राज्याचे (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवार २४ सप्टेंबर रोजी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्याकरिता तालुक्यातील मोहगव्हाण येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. पाहणी दरम्यान खा. संजय देशमुख, आ.शाम खोडे, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सुरेश लुंगे,सुरेश मापारी ,यावेळी बोलताना दोन दिवसात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ठोस मदत दिल्या जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
केंद्राकडून मदत मिळण्याची प्रतीक्षा न करता राज्याच्या निधीतून मदत देण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे तसेच कर्जमाफी करून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊन पिकविम्याचा प्रश्नही तात्काळ मार्गी लावण्यात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.तसेच जनावरांसाठी चारा व पाणी यासाठीही उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.