मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis: पत्रकारांचे काम हे अनियमित वेळेचे आणि सतत धावपळीचे असते. पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी व उपचार शिबीर महत्त्वपूर्ण ठरेल

पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis

 

विधानभवनात पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर; सुमारे ८९२ पत्रकारांची तपासणी

मुंबई (CM Devendra Fadnavis) : पत्रकारांचे काम हे अनियमित वेळेचे आणि सतत धावपळीचे असते. तासनतास रस्त्यावर, घटनास्थळी तसेच रात्री-अपरात्री काम करावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी व उपचार शिबीर महत्त्वपूर्ण ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने विधानभवन येथे पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शिबिराला भेट देऊन विविध तपासणी केंद्रांची पाहणी केली तसेच पत्रकारांच्या आरोग्याची आस्थेने विचारपूस केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, आमदार योगेश सागर, आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते.

नियमित आरोग्य तपासणी आवश्यक

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, पत्रकारांचे काम २४ तास सुरू असते. कामाचे निश्चित वेळापत्रक नसल्यामुळे अनेकदा त्यांना तासनतास रस्त्यावर किंवा घटनास्थळी राहून काम करावे लागते. याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नियमित आरोग्य तपासणी न झाल्यामुळे अनेकदा आजार बळावल्यानंतर त्याचे निदान होते. आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून प्राथमिक लक्षणे वेळीच ओळखून आवश्यक उपचार सुरू करता येतील. या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टर, नामांकित वैद्यकीय संस्था आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पत्रकारांसोबतच तासनतास उभे राहून काम करणाऱ्या कॅमेरामनसाठीही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. व्हेरिकोज व्हेन्ससारख्या समस्यांसाठी स्टॉकिंगची सुविधा तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नोडल अधिकारी

पत्रकारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी संघटनांचे अभिनंदन केले. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आजारपणाच्या काळात आवश्यक मदत व वैद्यकीय समन्वय मिळावा यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. हा अधिकारी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक उपचार, शस्त्रक्रिया तसेच वैद्यकीय सुविधांसाठी समन्वय साधण्यास मदत करणार आहे. आरोग्य तपासणी शिबीर केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता वर्षभर पत्रकारांना आवश्यक आरोग्यविषयक मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

विविध आजारांची तपासणी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात विविध वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी पत्रकारांची तपासणी करून मार्गदर्शन केले. शिबिरात नेत्ररोग, त्वचारोग, हृदयरोग, स्त्रीरोग, फिजिओथेरपी, जनरल मेडिसिन, अस्थिरोग, कर्करोग, रक्त तपासणी, श्वसनविकार, पोट व पचनसंस्थेचे विकार, कान-नाक-घसा, मानसिक आरोग्य, वजन नियंत्रण, दंतचिकित्सा, आयव्हीएफ व वंध्यत्व उपचार तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

न्यूरोलॉजिस्ट तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गीते, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, पुणे बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी पत्रकारांची तपासणी केली.

८९२ पत्रकारांची आरोग्य तपासणी

शिबिरात जे.जे. रुग्णालय, जी.टी. रुग्णालय, सेंट जॉर्ज, कामा रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय, आर.ए. पोदार, के.जी. मित्तल, मुंबादेवी रुग्णालय, कूपर रुग्णालय, नायर, बॉम्बे हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, रिलायन्स रुग्णालय आणि सेफी रुग्णालयासह विविध मनपा रुग्णालयांतील सुमारे ६०० तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळी ९ ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात सुमारे ८९२ पत्रकार आणि इतरांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले. काही पत्रकारांना पुढील उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.

यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब, टेलिव्हिजन जर्नालिस्ट असोसिएशन, मुंबई हिंदी पत्रकार संघ, मुंबई क्राईम रिपोर्टर्स असोसिएशन, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, बॉम्बे न्यूज फोटोग्राफर्स असोसिएशन, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ, व्हॉइस ऑफ मीडिया आणि पत्रकार विकास संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचा शासन निर्णय काढणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचा शासन निर्णय काढणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

CM Devendra Fadnavis:  दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचा शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार अशी माहिती मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Sep 24, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; सरसकट मदतीचा निर्णय: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; सरसकट मदतीचा निर्णय: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

CM Devendra Fadnavis: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा निर्णय घेतला असून,येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sep 23, 2026
पिकांचे सरसकट नुकसान, मदतही सरसकट; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

पिकांचे सरसकट नुकसान, मदतही सरसकट; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

CM Devendra Fadnavis: संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे न सोडता शासन पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली..

Sep 23, 2026
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis: शासनाने दुष्काळाची परिस्थिती अतिशय गांभीर्याने घेतली आहे. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

Sep 23, 2026