सोनम वांगचुक उपोषण

सोनम वांगचुक यांच्याशी केंद्राने चर्चा करावी, अन्यथा सोमवारी लाक्षणिक उपोषण

Sonam Wangchuk hunger strike: ज्येष्ठ पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही लातूरकर

सोनम वांगचुक यांच्याशी केंद्राने चर्चा करावी, अन्यथा सोमवारी लाक्षणिक उपोषण

Sonam Wangchuk hunger strike

 

'आम्ही लातूरकर'चा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन

लातूर (Sonam Wangchuk hunger strike) : ज्येष्ठ पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर "आम्ही लातूरकराच्यावतीने गुरुवारी पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी, लातूर यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात केंद्र सरकारने उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांच्याशी तातडीने चर्चा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततामय मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून, संवादातून प्रश्न सोडविणे हेच लोकशाहीचे खरे वैशिष्ट्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सोनम वांगचुक (Sonam Wangchuk hunger strike) यांच्या प्रकृतीची खालावत चाललेली स्थिती लक्षात घेता कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी केंद्र शासनाने प्रतिष्ठेचा प्रश्न न बनविता तातडीने चर्चेचा मार्ग स्वीकारून त्यांचे उपोषण मागे घेण्यास पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. केंद्र सरकारने सोनम वागचूक यांच्या उपोषणाची गांभिर्याने दखल न घेतल्यास 20/07/2026 सोमवारी महात्मा गांधी चौक लातूर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

या मान्यवरांची उपस्थिती...
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रामुख्याने अँड. उदय गवारे, माधव बावगे, रमेश बिरादार प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे, प्रा. दत्ता सोमवंशी अॅड. धनंजय झाडके, डॉ. गणेश गोमारे, प्रा. अर्जुन जाधव, अॅड. जे. एच शेख, अँड. गणेश यादव, सुनील कदम, विश्वंभर भोसले अँड. भालचंद्र कवठेकर, धर्मराज पाटील, बाळासाहेब यादव, खंडेराव गंगणे, लता बावगे, मीरा देशमुख, अँड. गजेंद्र येळकर, सोहम कवठेकर, प्रा. दशरथ भिसे, अँड. सुशील सोमवंशी, अँड. रामराजे आत्राम, अनिल दरेकर, उत्रेश्वर बिराजदार, अनिता मुदगले, रुकसाना मुल्ला, रंजना हसुरे' जयश्री कदम, सहारा शेख, अर्चना पाटील' जमील नाना शेख महेश माने आदी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

CJPच्या 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाला पोलिसांचा नकार; अभिजीत दिपकेंचा ‘जेल भरो’चा इशारा

CJPच्या 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाला पोलिसांचा नकार; अभिजीत दिपकेंचा ‘जेल भरो’चा इशारा

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून देशात राजकीय वाद सुरू असतानाच आता कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आंदोलनाची घोषणा केली आहे.

Sep 27, 2026
सोनम वांगचुकांच्या लडाख पदयात्रेत CJPचे प्रमुख नेते गैरहजर

सोनम वांगचुकांच्या लडाख पदयात्रेत CJPचे प्रमुख नेते गैरहजर

लडाखच्या मागण्यांसाठी सोनम वांगचुकांची लेहमध्ये पदयात्रा; CJP नेत्यांची अनुपस्थिती आणि २० जणांवरील गुन्हे मागे घेण्याचा प्रशासनाचा निर्णय चर्चेत.

Sep 24, 2026
चिंतामण भारती यांना ५ ऑक्टोबरपर्यंत दत्त शिखर संस्थानवर प्रतिबंध

चिंतामण भारती यांना ५ ऑक्टोबरपर्यंत दत्त शिखर संस्थानवर प्रतिबंध

माहूरच्या दत्त शिखर संस्थानमध्ये चिंतामण भारती यांच्या उपोषणाची दखल; ५ ऑक्टोबरपर्यंत संस्थानच्या मालमत्तेवर येण्यास प्रतिबंध.

Sep 19, 2026
कावड यात्रेमुळेच युवा धर्माच्या मार्गावर: खा. श्रीकांत शिंदे

कावड यात्रेमुळेच युवा धर्माच्या मार्गावर: खा. श्रीकांत शिंदे

Kavad Yatra: देशातील युवा वर्ग संस्कृती पासून दूर जात असल्याच्या तक्रारी होत असताना हिंगोली कळमनुरीत मात्र वेगळेच चित्र पहायला मिळाले. कावड यात्रेमध्ये सहभागी होणार्‍या या युवकांची श्रद्धा व जल्लोष

Aug 24, 2026
डॉ. अर्जुन महानर यांचे मेंढपाळ बांधवांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन

डॉ. अर्जुन महानर यांचे मेंढपाळ बांधवांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन

Shepherd Fasting Protest: मेंढपाळ बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी मेंढपाळ समाजाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अर्जुन महानर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्नत्याग आंदोलन

Aug 20, 2026