Free Bus Service

गणेशोत्सवासाठी २९०० मोफत एसटी बसेस; चाकरमान्यांना मोठा दिलासा

गणेशोत्सवासाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेने मोठा उपक्रम हाती घेतला आहे.

गणेशोत्सवासाठी २९०० मोफत एसटी बसेस; चाकरमान्यांना मोठा दिलासा

Free Bus Service

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी शिवसेनेचा उपक्रम; दरवर्षी सेवा सुरू ठेवण्याचा एकनाथ शिंदेंचा निर्धार

गणेशोत्सवासाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी तब्बल २९०० एसटी बसेसची पूर्णपणे मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. ठाणे येथे आयोजित मोफत बससेवेच्या तिकीट वितरण सोहळ्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाचा उत्सव असून, या काळात मोठ्या संख्येने नागरिक आपल्या मूळ गावी जातात. रेल्वे किंवा अन्य सार्वजनिक वाहतुकीची तिकिटे प्रत्येकाला उपलब्ध होतीलच असे नाही. ही अडचण लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या विचारधारेनुसार हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, पुढील काळातही दरवर्षी मोफत बससेवा सुरू ठेवण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला. गणेशभक्तांनी कोणतीही गैरसोय न होता उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला एकत्र आणणारी तसेच संस्कृती आणि परंपरा जपणारी परंपरा असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून समाजाला संघटित करण्याचे काम केले. त्याच परंपरेचा वारसा आजही सार्वजनिक गणेश मंडळे पुढे नेत असून, सामाजिक प्रबोधन, विविध विषयांवरील देखावे आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, शिवसेना सचिव राम रेपाळे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, नगरसेवक राजेश मोरे, अनिल भोर, विभागप्रमुख अमित जयस्वाल, किरण नाकती यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिंदे यांनी आपल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील विविध निर्णयांचाही आढावा घेतला. कोरोना काळानंतर सण-उत्सवांवरील निर्बंध हटवून नागरिकांना आपले सण उत्साहाने साजरे करता यावेत, यासाठी निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील सर्वाधिक समाधान देणारी योजना असल्याचे शिंदे यांनी म्हटले. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांशी ‘लाडका भाऊ’ म्हणून आपले नाते निर्माण झाले, याचा आनंद आणि समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत, नावासमोर आईचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय, कौशल्य विकास, स्टार्टअप तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन अशा विविध योजना राबविण्यात आल्याचेही शिंदे यांनी नमूद केले. विकासकामे आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026