हिंगोली आरोग्य अभियान

'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानाचा हिंगोलीत श्रीगणेशा

Majha Gaav Arogya Sampanna Gaav: हिंगोलीत पंचायत समितीने 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानाला सुरूवात केली. यानिमित्ताने विविध आरोग्य कार्यक्रमांचे आयोजन

'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानाचा हिंगोलीत श्रीगणेशा

Majha Gaav Arogya Sampanna Gaav

 

द्वितीय सेवा हक्क २८ एप्रिल दिवस साजरा 

हिंगोली (Majha Gaav Arogya Sampanna Gaav) :  पंचायत समिती कार्यालय हिंगोली येथे द्वितीय सेवा हक्क २८ एप्रिल दिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्र सेवा हक्क याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम २०१५  ची अंमलबजावणी व्हावी यासाठी विशेष प्रचार प्रसिद्धी सर्वांनी करावी असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले.

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण आरोग्य विकासाचा ध्यास घेत सुरू करण्यात आलेल्या 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' (Majha Gaav Arogya Sampanna Gaav) या महत्त्वाकाक्षी अभियानाचा पंचायत समिती कार्यालय हिंगोली येथे २८ रोजी मंगळवारी उत्साहपूर्ण वातावरणात श्रीगणेशा झाला. पंचायत समिती न्यायालयातील सभागृहात पार पडलेल्या तालुकास्तरीय कार्यशाळा व मेळाव्याला विविध विभागातील अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या सख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष-स्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, गट विकास अधिकारी माया वानखडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड सहाय्यक गट विकास अधिकारी विष्णू भोंजे,  आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात विवेक गायकवाड यानी अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना, प्रथम स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवणे आणित्यानतर संपूर्ण गावाच्या आरोग्याची जबाबदारी उचलणे, ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे स्पष्ट केले. आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी आणि ग्राम पंचायत अधिकारी यांनी एकत्रितपणे कार्य करत ५९ निर्देशाकाची पूर्तता करून जिल्ह्याचे नाव राज्य स्तरावर अग्रक्रमांकावर आणण्याचे आवाहन त्यानी केले.

मेहनतीला पर्याय नाही, प्रामाणिक प्रयत्न केल्यास त्याचे फळ निश्चितच मिळते, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला. एक मे रोजी महाराष्ट्र दिनी गावामध्ये ग्रामसभा आयोजित करून माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची जास्तीत जास्त जनजागृती करणे यासाठी आशा वर्कर आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुढाकार घेऊन काम करावे हिंगोली तालुक्यातील 111 ग्रामपंचायत ह्या तिथी मुक्त अभियानात आल्या पाहिजेत आपलं "गाव प्रदूषण मुक्त गाव",  "प्लास्टिक मुक्त गाव" (Majha Gaav Arogya Sampanna Gaav) आयुष्यमान भारत कार्ड व वय वंदना कार्ड  आणि आभा कार्ड काढण्याचे काम पूर्ण झाले पाहिजे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे 'प्रश्न मनाचे' या पुस्तकाचे, छोटी सोच, पाव की मुछ. आणि गणपती बाप्पाचे उदाहरण असे अनेक प्रकारचे उदाहरण देऊन मार्गदर्शन केले सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या भरीव पुरस्कारांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीसाठी राज्य-स्तरावर प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी, तृतीय २ कोटी रुपये, विभागस्तरावर प्रथम १ कोटी, तर जिल्हास्तरावर प्रथम २५ लाख रुपयापर्यंतचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुरणालयासाठीही आकर्षक पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वय साधून मिशन मोडमध्ये काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी असे सांगितले की, 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' (Majha Gaav Arogya Sampanna Gaav) या अभियानात आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचे महत्त्वाची भूमिका आहे. आशा वर्कर  यांनी व्यवस्थित नियोजन करून सुरळीतपणे कामे करावे, ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सहकार्य करून अभियान यशस्वी करावे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची सविस्तर माहिती देऊन ग्रामपंचायत अधिकारी आशा वर्कर आरोग्य कर्मचारी समुदाय आरोग्य अधिकारी यांनी एकत्र येऊन  काम करावे असे आवाहन केले अभियान यशस्वी राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड यांनी महाराष्ट्र सेवा हक्क याविषयी माहिती देऊन महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम २०१५ ची अंमलबजावणी व्हावी. यासाठी विशेष प्रचार प्रसिद्धी करून ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसभा आयोजित करून जास्तीत जास्त जनजागृती करण्यात येणार आहे. प्रास्ताविकेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी 'माझ गाव आरोग्य संपन्न गाव' (Majha Gaav Arogya Sampanna Gaav) या अभियानाची सविस्तर माहिती दिली तर गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी आभार व्यक्त  केले. यावेळी तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी,  समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा वर्कर व  गट प्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026