Housing Society

हाऊसिंग सोसायट्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मेंटेनन्सवरील व्याजदरात मोठी कपात, नवे नियम लागू

राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मेंटेनन्स शुल्क आणि उशिराने भरल्या जाणाऱ्या देयकांवरील व्याजदर यावरून वारंवार निर्माण होणारे वाद लक्षात घेऊन राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत.

हाऊसिंग सोसायट्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मेंटेनन्सवरील व्याजदरात मोठी कपात, नवे नियम लागू

Housing Society

मेंटेनन्स शुल्क, विलंब दंड आणि व्याज आकारणीबाबत स्पष्ट नियमावली; जुन्या ठरावांचे पुनरावलोकन करण्याची तज्ज्ञांची सूचना

राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मेंटेनन्स शुल्क आणि उशिराने भरल्या जाणाऱ्या देयकांवरील व्याजदर यावरून वारंवार निर्माण होणारे वाद लक्षात घेऊन राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार मेंटेनन्स शुल्कावरील व्याज आकारणीसाठी सुधारित मर्यादा निश्चित करण्यात आली असून, याचा परिणाम राज्यातील लाखो सोसायट्या आणि रहिवाशांवर होणार आहे.

फ्लॅटच्या क्षेत्रफळानुसार की प्रत्येक फ्लॅटसाठी समान शुल्क आकारायचे, तसेच मेंटेनन्स वेळेत न भरल्यास किती दंड किंवा व्याज आकारायचे, याबाबत अनेक सोसायट्यांमध्ये मतभेद निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर सरकारने स्पष्ट नियम लागू करत या विषयातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

१८ जून २०२६ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) नियम लागू झाला. या सुधारणेनंतर मेंटेनन्स किंवा इतर देयके उशिरा भरल्यास आकारण्यात येणाऱ्या वार्षिक व्याजदराची कमाल मर्यादा २१ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. मात्र, अनेक गृहनिर्माण संस्थांना या बदलाची माहिती नसल्याने काही ठिकाणी अजूनही जुन्या सर्वसाधारण सभेच्या ठरावांनुसार अधिक दराने व्याज आकारले जात असल्याचे समोर आले आहे.

यामुळे अशा संस्थांना थकबाकीदार सदस्यांकडून कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कारण सुधारित नियम लागू झाल्यानंतर पूर्वीचे संबंधित ठराव कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य राहणार नाहीत. याबाबतचे वृत्त Mid-day ने प्रसिद्ध केले आहे.

कायदेतज्ज्ञ ॲड. श्रीप्रसाद एम. परब यांच्या मते, सर्व गृहनिर्माण संस्थांनी आपल्या व्याज आकारणीच्या पद्धती तातडीने सुधारित कायद्याशी सुसंगत करणे आवश्यक आहे. तसेच भविष्यातील वाद आणि थकबाकी वसुलीतील कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी जुन्या ठरावांचे पुनरावलोकन करून आवश्यक बदल करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम 154B-1(17) नुसार गृहनिर्माण संस्थांचे मुख्य उद्दिष्ट सदस्यांना निवास, सामायिक सुविधा आणि आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे आहे. तसेच सर्वसाधारण सभेचे सर्व निर्णय हे विद्यमान कायदे, शासकीय नियम आणि नोंदणीकृत उपविधी यांच्या चौकटीतच असणे बंधनकारक आहे.

कलम ७२ चा उल्लेख करत ॲड. श्रीप्रसाद परब यांनी स्पष्ट केले की, सर्वसाधारण सभा ही संस्थेची सर्वोच्च निर्णयप्रक्रिया असली तरी ती कायद्यापेक्षा मोठी नाही. त्यामुळे कायद्याच्या तरतुदींना विरोध करणारा कोणताही ठराव वैध मानला जाऊ शकत नाही आणि बहुमताने घेतलेला निर्णयही विद्यमान कायद्याच्या चौकटीतच असणे आवश्यक आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; EMIचा भार वाढणार? RBIचा रेपो रेट ५.५०% वर

कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; EMIचा भार वाढणार? RBIचा रेपो रेट ५.५०% वर

RBIने रेपो रेट ५.५०% केला. होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या EMIवर परिणाम होण्याची शक्यता.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026