रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस; प्रकृती खालावल्याने कुटुंबीय पंढरपुरात

आंदोलनाला शेतकरी वर्गातून प्रतिसाद मिळत असून, आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर आली आहे.

रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस; प्रकृती खालावल्याने कुटुंबीय पंढरपुरात

Hunger Strike

कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू; बीपी आणि शुगर घटल्याने डॉक्टरांचा सलाईनचा सल्ला, मात्र रोहित पवारांचा नकार

सोलापूर (Hunger Strike) : शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तीं शिवाय कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला शेतकरी वर्गातून प्रतिसाद मिळत असून, आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या दोन दिवसांत रोहित पवार यांनी अन्नासोबतच पाणीही घेतले नव्हते. त्यामुळे शनिवारी रात्री त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यानंतर वैद्यकीय पथकाने त्यांना पाणी आणि ओआरएस घेण्याचा सल्ला दिला. पवार यांनी पाणी घेतले असले तरी ओआरएस घेण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. परिणामी त्यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होत असल्याची माहिती मिळत आहे.

प्रकृती खालावत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज त्यांचे संपूर्ण कुटुंब पंढरपुरातील आंदोलनस्थळी दाखल झाले. यामध्ये त्यांची आई, बहीण, पत्नी तसेच दोन्ही मुलांचा समावेश होता. कुटुंबीयांना पाहून वातावरण भावनिक झाले. दरम्यान, रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे मागील दोन दिवसांपासून आंदोलनस्थळी उपस्थित असून, मंचावर नसले तरी ते आंदोलनात सहभागी असल्याचे सांगितले जात आहे.

या आंदोलनाला विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांवरून पाठिंबा मिळत आहे. काँग्रेस पक्षानेही रोहित पवार यांच्या मागणीला समर्थन दिले आहे. तसेच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे देखील आंदोलनस्थळी भेट देणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, रोहित पवार यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचे डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यांच्या प्रकृतीची काळजी लक्षात घेऊन डॉक्टरांनी सलाईन लावण्याची सूचना केली होती. मात्र, पवार यांनी सलाईन घेण्यास नकार दिला आहे.

राज्य सरकारमधील संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन हे रोहित पवार यांची भेट घेण्यासाठी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर ते पवार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच सलाईन लावण्याबाबत निर्णय घेऊ, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या भेटीत सरकार आणि रोहित पवार यांच्यात काही तोडगा निघतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026