इलूर चिमुरडी मृत्यू

इल्लूर येथे खड्यात बुडून सहा वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ilur little Girl Death: इल्लूर गावात सहा वर्षीय चिमुरडीचा पाण्याने भरलेल्या खड्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना, संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली..

इल्लूर येथे खड्यात बुडून सहा वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ilur little Girl Death

आष्टी/ गडचिरोली (Ilur little Girl Death) : आष्टीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इल्लूर गावात सहा वर्षीय चिमुरडीचा पाण्याने भरलेल्या खड्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. ६ जुलै) दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इलूर येथील श्रद्धा मीणा बाळाजी मडावी (वय ६ वर्षे) ही आपल्या एका मैत्रिणीसोबत घराशेजारी असलेल्या खड्ड्याकडे शौचास गेली होती. यावेळी पाण्याने भरलेल्या खड्यात उतरत असताना श्रद्धाचा तोल गेला आणि ती खोल पाण्यात पडली. पाण्याची खोली अधिक असल्याने तिला बाहेर पडता आले नाही. काही क्षणांतच ती पाण्यात बुडाली.

सोबत असलेल्या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी तातडीने शोध घेऊन चिमुरडीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत तिचा (Ilur little Girl Death) मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.

या (Ilur little Girl Death) दुर्दैवी घटनेमुळे इल्लूर गावात शोककळा पसरली आहे. पावसाळ्यात पाण्याने भरलेल्या खड्डे, तलाव व ओढ्यांच्या परिसरात लहान मुलांना एकटे जाऊ न देण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात येत असून अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.

संबंधित सामग्री

नौकरीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या

नौकरीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या

Youth suicide: युवकने नैराश्यामुळे भोवतीच्या छतावरून आत्महत्या करून मृत्यू होण्याची घटना झाली. अपेक्षित यश मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल

Jul 05, 2026
नांगरणी करताना तरुण शेतकर्‍यावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू  

नांगरणी करताना तरुण शेतकर्‍यावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू  

Youth Farmer Death: भानखेडा येथे शेतकरी जगन सिताराम कोटकर यांचा जागीच मृत्यू होणारा घटना, वीजकोसळल्याने झालेल्या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

May 26, 2026