नवी दिल्ली/ मुंबई (Arjuna award 2025 List) : क्रीडा मंत्रालयाने आज अर्जुन पुरस्कार 2025 साठी निवड झालेल्या खेळाडूंच्या नावांची घोषणा केली. विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील 17 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यासोबतच द्रोणाचार्य पुरस्कारासाठीही प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कारांसाठी खेळाडू आणि प्रशिक्षकांची नावे निश्चित केली आहेत.
दिव्या देशमुख, विदित गुजरातीसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार
महाराष्ट्रासाठी यंदाच्या पुरस्कारांमध्ये विशेष अभिमानाची बाब ठरली आहे. नागपूरची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिची अर्जुन पुरस्कार 2025 साठी निवड करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील आघाडीचा बुद्धिबळपटू विदित गुजराती यालाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. (National Sports Awards) अर्जुन पुरस्कारासाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये लांब उडीत रौप्यपदक जिंकणाऱ्या तेजस्विन शंकर यांचाही समावेश आहे.
𝐀𝐑𝐉𝐔𝐍𝐀 𝐀𝐖𝐀𝐑𝐃𝐒 𝐀𝐍𝐍𝐎𝐔𝐍𝐂𝐄𝐃! 🇮🇳
— India_AllSports (@India_AllSports) August 18, 2026
Prominent athletes:
Tejaswin Shankar (Athletics)
Gayathri Gopichand & Treesa Jolly (Badminton)
Divya Deshmukh & Vidit Gujarathi (Chess)
Lalremsiami (Hockey)
Akhil Sheoran (Shooting)
Complete list ⬇️ #ArjunaAwards pic.twitter.com/7Sp0zMMLRg
बॅडमिंटनमध्ये त्रिशा जॉली आणि पुलेला गायत्री गोपीचंद, तर ॲथलेटिक्समध्ये मोहम्मद अजमल व्ही. आणि प्रियंका गोस्वामी यांची निवड झाली आहे. बॉक्सिंगमध्ये नरेंद्र, पॅरा-शूटिंगमध्ये रुद्रांश खंडेलवाल यांची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हॉकीमध्ये लालरेमसियामी आणि राजकुमार पाल यांना अर्जुन पुरस्कार मिळणार आहे. याशिवाय कबड्डीतील सुरजीत आणि पूजा, पॅरा-ॲथलेटिक्समधील एकता भ्यान, रोइंगमधील अरविंद सिंग आणि शूटिंगमधील अखिल शेओरन यांचीही (Arjuna award 2025) अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अर्जुन पुरस्कार हा गेल्या चार वर्षांत क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिला जातो. यामध्ये खेळाडूची कामगिरी, नेतृत्वगुण, खिलाडूवृत्ती आणि शिस्त यांचा विचार केला जातो.
द्रोणाचार्य पुरस्कारासाठीही प्रशिक्षकांची निवड
द्रोणाचार्य पुरस्कार 2025 साठी (Dronacharya Award) ॲथलेटिक्समधील परवीर सिंग, बॉक्सिंगमधील छोटे लाल यादव आणि नेमबाजीतील नेहा नंदकुमार चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. तर द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार 2025 साठी (National Sports Awards) बॉक्सिंगचे धर्मेंद्र सिंह यादव आणि कुस्तीचे वीरेंद्र कुमार यांची निवड झाली आहे. याशिवाय राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार 2025 हा आर्मी पॅरालिम्पिक नोड, पुणे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या (National Sports Awards) पुरस्कारांच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रासाठीही मोठी आनंदाची बातमी समोर आली असून, दिव्या देशमुख (Divya Deshmukh) आणि विदित गुजराती यांच्या निवडीमुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.