Pakistani Boxer

‘मला नरेंद्र नावाचीच चीड आली’; बॉक्सर नरेंद्र बेरवाल यांनी PM मोदींना सांगितला पाकिस्तानी बॉक्सरचा भन्नाट किस्सा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजधानीतील त्यांच्या निवासस्थानी २०२६ कॉमनवेल्थ गेम्सच्या भारतीय पथकाची भेट घेतली.

‘मला नरेंद्र नावाचीच चीड आली’; बॉक्सर नरेंद्र बेरवाल यांनी PM मोदींना सांगितला पाकिस्तानी बॉक्सरचा भन्नाट किस्सा

Pakistani Boxer

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजधानीतील त्यांच्या निवासस्थानी २०२६ कॉमनवेल्थ गेम्सच्या भारतीय पथकाची भेट घेतली. यावेळी त्यांनी पदकविजेत्या खेळाडूंचे कौतुक करताना ग्लासगो येथील त्यांच्या कामगिरीने पुढील पिढीला प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.

या संवादादरम्यान भारतीय बॉक्सर नरेंद्र बेरवाल यांनी २०१५ च्या वर्ल्ड मिलिटरी गेम्समधील एक मजेदार किस्सा सांगितला. पाकिस्तानी बॉक्सरविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर घडलेल्या या प्रसंगामुळे पंतप्रधान मोदींनाही हसू आवरले नाही.

बेरवाल यांनी सांगितले की, “माझा पहिल्याच फेरीतील सामना पाकिस्तानच्या बॉक्सरविरुद्ध होता. सैन्याकडून मला फोन आला होता की, पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तुम्ही हारता कामा नये. मी तो सामना जिंकला. मात्र, या सामन्यात आम्हा दोघांनाही दुखापती झाल्याने टाके घालण्यासाठी रुग्णालयात जावे लागले.”

विशेष म्हणजे, त्या मिलिटरी गेम्समध्ये बेरवाल यांच्यासोबत असलेल्या आर्मी कोचचे नावही नरेंद्र राणा होते.

यानंतर रुग्णालयात उपचार घेत असताना पाकिस्तानी बॉक्सरने बेरवाल यांना म्हटले, “भाईजान, आपका नाम नरेंद्र है, आपके कोच का नाम नरेंद्र है और आपके PM का नाम नरेंद्र है... मुझे नरेंद्र नाम से नफरत हो गई है.”

अर्थात, “तुमचं नाव नरेंद्र, तुमच्या प्रशिक्षकाचं नाव नरेंद्र आणि तुमच्या पंतप्रधानांचं नावही नरेंद्र आहे. त्यामुळे आता मला नरेंद्र या नावाचीच चीड आली आहे,” असे त्याने गंमतीने म्हटल्याचे बेरवाल यांनी सांगितले.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी

२०२६ कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय बॉक्सरांनी विक्रमी कामगिरी करत एकूण १० पदके पटकावली. यामध्ये ७ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकांचा समावेश आहे.

नरेंद्र बेरवाल यांनी पुरुषांच्या +90 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. भारतीय लष्करातील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO) असलेल्या बेरवाल यांनी २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळवले असून, आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही त्यांनी दोन पदके जिंकली आहेत.

अंकुश पंघाल, सचिन सिवाच, जस्मिन लांबोरिया, प्रीती पवार, साक्षी चौधरी, अरुंधती चौधरी आणि प्रिया घंघास यांनी सुवर्णपदक पटकावले. तर ऑलिम्पिक पदकविजेती लव्हलिना बोरगोहेन आणि जडुमणी सिंह यांनी रौप्यपदक जिंकले.

संबंधित सामग्री

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
“कमाल कर दिया पायलट जी!” फ्लायदुबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे सलमान खानकडून कौतुक

“कमाल कर दिया पायलट जी!” फ्लायदुबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे सलमान खानकडून कौतुक

फ्लायदुबई FZ1073 संकटातील कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे सलमान खानने कौतुक केले. मोदींसोबतच्या संवादात मच्छार यांनी थरारक अनुभव सांगितला.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

फ्लाय-दुबई पायलट स्मित माछर यांनी PM मोदींशी संवादात विमानातील संकटाचा अनुभव सांगितला. हनुमान चालिसेमुळे धैर्य मिळाल्याचे त्यांनी म्हटले.

Oct 02, 2026
फ्लाय दुबई विमानात हायजॅकचा अलर्ट; भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाने संकट टळलं

फ्लाय दुबई विमानात हायजॅकचा अलर्ट; भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाने संकट टळलं

फ्लाय दुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात कॉकपिटमध्ये हल्ला; 7700 आणि 7500 अलर्टनंतर विमान सौदीतील तबूकमध्ये उतरले.

Oct 01, 2026