पेपरफुटी आंदोलन

झारखंड पेपरफुटी विरोधात आंदोलन! रांचीमध्ये दिल्लीची पुनरावृत्ती?

NEET PaperLeak Protest: झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा पेपरफुटी प्रकरणी पुकारलेले आंदोलन तीव्र झाले असून, आंदोलनकर्त्यांनी आज विधानसभा भवनाच्या दिशेने मार्च सुरु केला आहे. ‘विधानसभा घेराव’ मार्च

झारखंड पेपरफुटी विरोधात आंदोलन! रांचीमध्ये दिल्लीची पुनरावृत्ती?

NEET PaperLeak Protest

रांची (NEET PaperLeak Protest) : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा पेपरफुटी प्रकरणी पुकारलेले आंदोलन तीव्र झाले असून, आंदोलनकर्त्यांनी आज विधानसभा भवनाच्या दिशेने मार्च सुरु केला आहे. ‘विधानसभा घेराव’ मार्चच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स ओलांडून विधानभवनाच्या दिशेने मार्च सुरुच ठेवल्यानंतर (NEET PaperLeak Protest) आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅनन आणि अश्रूधुरांच्या नळकांड्यांचा देखील वापर केला.

हजारो विद्यार्थी, तरुण सहभागी

मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी (NEET PaperLeak Protest) झारखंडमधून हजारो विद्यार्थी राजधानी रांचीमध्ये दाखल झाले आहेत. दुसरीकडे भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरु केल्यानंतर काही नेत्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड स्टाफ सिलेक्शन परीक्षांमध्ये घोटाळा आणि पेपरफुटीप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत होते.

विधानभवनाच्या दिशेने मोर्चा

झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसह इतर सरकारी परीक्षांमध्ये पेपरफुटी झाल्याचा गंभीर आरोप करत गेल्या काही दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. (NEET PaperLeak Protest) परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून आज हजारो विद्यार्थ्यांनी विधानभवनाच्या दिशेने मोर्चा काढला आहे. रांचीमधील कायदा आणि सुव्यवस्था विचारात घेता पोलिसांनी अनेक संवेदनशील ठिकाणी बॅरिकेड्स उभारले आहेत. तसेच, महत्वाचे रस्ते, चौकात मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी संबंधित 13 FIR रद्द

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी संबंधित 13 FIR रद्द

NEET प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाशी संबंधित कॉक्रोच जनता पार्टीच्या 13 एफआयआरवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय दिला.

Sep 01, 2026
'खाऊन-पिऊन आंदोलन करा, मी चोरून खायचो आणि आंदोलन करायचो'आदिवासी विद्यार्थ्यांना नरहरी झिरवळ  यांचा अजब सल्ला

'खाऊन-पिऊन आंदोलन करा, मी चोरून खायचो आणि आंदोलन करायचो'आदिवासी विद्यार्थ्यांना नरहरी झिरवळ यांचा अजब सल्ला

पुण्यातील मांजरी परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले आंदोलन आणि उपोषण १४व्या दिवशीही कायम आहे.

Aug 27, 2026
पेलेट गन प्रकरणावर राहुल गांधी आक्रमक; दिल्ली पोलिसांच्या DCP कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

पेलेट गन प्रकरणावर राहुल गांधी आक्रमक; दिल्ली पोलिसांच्या DCP कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पेलेट गनच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Aug 21, 2026