लातूर महापालिका

लातूर महापालिका 'अजेंड्या'वर 'महापौर निवास'!

Latur Municipal Corporation: लातूरच्या महापौरांसाठी महापौर निवास बांधकामाचा आणि लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाचा विषय उद्या होणाऱ्या लातूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण..

लातूर महापालिका 'अजेंड्या'वर 'महापौर निवास'!

Latur Municipal Corporation

 

चाकूरकरांच्या स्मारकावर गाजणार आजची सर्वसाधारण सभा

लातूर (Latur Municipal Corporation) : लातूरच्या महापौरांसाठी महापौर निवास बांधकामाचा आणि लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाचा विषय उद्या होणाऱ्या लातूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील अजेंड्यावरचे महत्त्वाचे विषय आहेत. या विषयावर लातूर महापालिकेची सभा वादळी होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे या सभेत महिला व बालकल्याण समिती सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.

उद्या बुधवारी (दि.5) लातूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होत आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील' कलम 30 (1) नुसार महिला व बालकल्याण समिती सदस्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. या नियुक्त्या कलम 31-अ नुसार प्रमाणशीर प्रतिनिधत्व देऊन करण्यात येणार आहेत. त्यामुळे या समितीवर कोणत्या भाग्यवान 13 सदस्यांची निवड होईल, याची उत्सुकता लातूरकरांना लागली आहे.

लातूर महानगरपालिकेची (Latur Municipal Corporation) सर्वसाधारण सभा सकाळी ठीक 11 वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. महानगरपालिका ह‌द्दीमध्ये शासन नियमाप्रमाणे गुंठेवारीस मुदतवाढ देणे, विविध विकास प्रकल्पांकरिता कर्ज / कर्ज रोखे (बॉन्ड) उभारणे, विकास योजनांना मुदतवाढ देणे, शहरात आवश्यक ठिकाणी रस्त्यांना पॅचवर्क करणेसाठी चर्चा करणे. शहरात पिण्याचे पाणी पिवळे येऊ नये म्हणून कैमिकल लॅब उभारणी करणे व त्यासाठी एन.सी.एल. पुणे यांची लॅब सल्लागार म्हणून नियुक्ती करणे या विषयावर सभेत चर्चा होणार आहे.

प्रकाश नगर येथील नालंदा बौद्ध विहाराचे दुस-या मजल्याचे बांधकाम व सुशोभिकरण करणे, 110 कोटींचा भांडवली गुंतवणूक प्रस्ताव सादर करण्यात येणार असून गंजगोलाई शॉपिंग कॉम्प्लेक्स व विवेकानंद चौक पाणी टाकी, अण्णाभाऊ साठे पार्कीग, भाजी मार्केट, नवयुग थेटर जवळील मनपाच्या मालकीची जागा व इतर प्रकल्प उभारणेबाबत या सभेमध्ये निर्णय अपेक्षित आहे. 

लातूरमध्ये महापौरांसाठी (Latur Municipal Corporation) निवासस्थान बांधणे, मोहन नगरातील अतिक्रमण नियमानुकूल करणे, हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे योजनेअंतर्गत मनपा शाळांचे आधुनिकीकरण करणे या विषयावरही चर्चा होणार आहे.

डॉक्टर बाबासाहेबांच्या 75 फुटी पुतळ्यासाठी अभ्यास दौरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे 75 फुटी पुतळयाची निर्मिती व उ‌द्यान यांचा एकत्रित विकास करणेबाबत आराखडा व अभ्यास दौरा करणेबाबत या सभेमध्ये महत्त्वाचा विषय आहे. थोर समाजसुधारक क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळयासाठी जागा निश्चित करुन पुतळा उभारणी करणे बाबत या सभेत निर्णय अपेक्षित आहे.

चाकूरकरांचे स्मारक नेमके कुठे?
लातूर शहरात आ. शिवराज पाटील चाकूरकर यांचे आदर्श कॉलनी परिसरात स्मारक उभारणीबाबत नागरिकांच्या सूचना मागवून आराखडा तयार करणे व शासनाचा निधी उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या विषयावर महापालिका सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. वास्तविक चाकूरकरांचे स्मारक उभारण्याचा मानस सर्वच लातूरकरांचा असला तरी, हे स्मारक नेमके कुठे उभारावे? याबाबत या महापालिका सभेत मतभेद उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या सर्वसाधारण सभेकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

लातूर शहराच्या प्रलंबित विकासकामांना गती द्या!

लातूर शहराच्या प्रलंबित विकासकामांना गती द्या!

शहरातील रखडलेली विकासकामे तातडीने मार्गी लावावीत अशा सूचना आमदार बसवराज पाटील यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या.

Sep 04, 2026
दोन दिवसांचा पगार काढण्यास भाजपाचा विरोध; महापालिकेतील बेमुदत बंद प्रकरणावर गटनेते दीपक मठपतींची भूमिका

दोन दिवसांचा पगार काढण्यास भाजपाचा विरोध; महापालिकेतील बेमुदत बंद प्रकरणावर गटनेते दीपक मठपतींची भूमिका

मुदत बंदमुळे शहरातील नागरिकांना पाणी मिळाले नाही, असा आरोप भाजपाचे गटनेते ॲडव्होकेट दीपक मठपती यांनी केला.

Aug 22, 2026
लातूर महापालिकेत 'आंधळ्या कोशिंबिरी'चा खेळ!

लातूर महापालिकेत 'आंधळ्या कोशिंबिरी'चा खेळ!

Latur Municipal Corporation: शहरातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या लातूर महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून 'आंधळ्या कोशिंबिरी'चा खेळ खेळला जात आहे.

Aug 12, 2026
बंद केलेली शहर बस सेवा तात्काळ सुरू करा!

बंद केलेली शहर बस सेवा तात्काळ सुरू करा!

लातूर शहरातून आजूबाजूच्या गावांकडे सुरू असलेली महानगरपालिकेची सिटी बस सेवा गेल्या सहा दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

Jul 30, 2026
अनधिकृत बांधकाम प्रकरणी नियमोचित कार्यवाही करा!

अनधिकृत बांधकाम प्रकरणी नियमोचित कार्यवाही करा!

अनधिकृत बांधकाम प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करून नगरसेविका शितल मालू यांना नगरसेवकपदावरून अपात्र ठरविण्याची मागणी कापडमिल भागातील नागरिक मुस्तफा शबीरअली हन्नुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Jul 30, 2026