सकल मराठा समाज

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन होण्यापूर्वी सकल मराठा समाज आक्रमक 

Sakal Maratha Samaj: उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेडच्या विमानतळावर आगमन होण्यापूर्वी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात ३० ऑगस्ट रोजी घोषणाबाजी केली.

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन होण्यापूर्वी सकल मराठा समाज आक्रमक 

Sakal Maratha Samaj

नांदेड (Sakal Maratha Samaj) : मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंतरवाली सराटी येथे उपोषणास  पुन्हा सुरुवात केली. त्यातच उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेडच्या विमानतळावर आगमन होण्यापूर्वी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात ३० ऑगस्ट रोजी घोषणाबाजी केली. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस मुख्यालयात रवानगी केली.

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला (Sakal Maratha Samaj) कुणबीचे दाखले मिळावेत व ओबीसी संवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी वेळोवळी आंदोलन करत असतांना सरकार समाजाला फसवत आहे. जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. एकीकडे सामाजिक हिताचे आंदोलन चालु असताना मंत्र्यांनी दौरे करणे ही बाब अत्यंत निंदनीय आहे, तसेच जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परभणी येथील कार्यक्रम होवु देणार नाही शिंदेंनी येवु नये असे आवाहन केले होते.

दरम्यान नांदेडच्या विमानतळावरुन  राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परभणीकडे जाऊ देणार नाही, (Sakal Maratha Samaj) सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते यांचा जत्था  थेट विमानतळावर  जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. दशरथ कपाटे, सुभाष कोल्हे, राज सरकार, सुभाष शिंदे, गणेश कपाटे, अंकुश कोल्हे, पवन सुर्यवंशी, अक्षय माने, राजेश मोरे व ईतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांकडुन मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, एकनाथ शिंदे  परत जा, जय जिजाऊ  जय शिवराय, जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा  घोषणा देण्यात आल्या.

आंदोलन करताना ताब्यात घेवून पोलिस व्हॅनद्वारे आंदोलनकर्त्यांची पोलिस मुख्यालयात रवानगी केली असून या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात प्रकरणाची नोंद करण्यात आली.

संबंधित सामग्री

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026