शालेय शिक्षण विभाग

विद्यार्थ्यांची गळती रोखणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य: शिक्षणमंत्री दादाजी भुसे

School Education Department: महाराष्ट्र शासनाने शाळा पटसंख्या आणि गुणवत्तेला सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजनांना सुरुवात केली आहे. शिक्षकांची भरती, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुधारणा

विद्यार्थ्यांची गळती रोखणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य: शिक्षणमंत्री दादाजी भुसे

School Education Department

 

शालेय शिक्षण विभागाकडून सर्वंकष उपाययोजना

मुंबई (School Education Department) : ज्ञानदानाचे पवित्र काम करण्यात अनेक महानुभावांचे मोठे योगदान आहे प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले असून राज्यातील विद्यार्थ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. राज्यातील शासकीय व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शिक्षणाची गुणवत्ता, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि शाळांमधील मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी शासन सर्वंकष धोरण राबवत असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे, असे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत  सांगितले.

सदस्य विक्रम काळे यांनी याविषयी विधान परिषदेत म. वि. प. नियम २६० अन्वये प्रस्ताव मांडला होता. या (School Education Department) प्रस्तावाच्या चर्चेत  सदस्य सुधाकर अडबाले, किरण सरनाईक, ज्ञानेश्वर म्हात्रे, धैर्यशील कदम, संजय भेंडे यांनी सहभाग घेतला. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, विद्यार्थ्यांची गळती रोखणे, शिक्षक भरती, आयसीटी व अटल लॅब, रोबोटिक्स शिक्षण, अकरावीचे ऑनलाइन प्रवेश, टप्पा अनुदान, टीईटी, अशैक्षणिक कामांचा भार कमी करणे, शाळांच्या भौतिक सुविधा, अनधिकृत शाळांवरील कारवाई, अल्पसंख्याक शाळांतील प्रश्न, कस्तुरबा गांधी विद्यालय, पवित्र पोर्टल आणि शिष्यवृत्ती महापोर्टल अशा विविध विषयांवर  गांभीर्याने काम करण्यात येत आहे.

राज्यात पहिली ते बारावीपर्यंत एक लाखांहून अधिक शाळा, सात लाखांपेक्षा अधिक शिक्षक आणि २.१० कोटी विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगत.  शालेय शिक्षण विभागासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ८८ हजार ४९४ कोटी रुपयांची अर्थसंकल्पाच्या  तरतूद करण्यात आली असल्याचे शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रति विद्यार्थी सुमारे ९७ हजार रुपये खर्च होत असून, अनुदानित शाळांमध्ये हा खर्च ३८ ते ४० हजार रुपये आहे. आरटीई अंतर्गत प्रतिपूर्तीसाठी अडीच हजार कोटी रुपये प्रलंबित असल्याची माहितीही त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगताना मंत्री भुसे म्हणाले की, शाळा सुरू होण्यापूर्वीच बहुतांश पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोहोचविण्यात आली आहेत. गणवेशासाठी आवश्यक निधीही स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात आला असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश मिळावा यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली गुणवत्ता नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यात शाळा प्रवेशोत्सव व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असून, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य तसेच लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाने शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे. या उपक्रमामुळे शाळांकडे समाजाचे लक्ष वेधले जात असून, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे आणि शाळांतील सुविधांमध्ये सुधारणा करणे हा त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टप्पा अनुदानाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून, शिक्षकांच्या मागण्यांवर शासन अनुकूल निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांची माहिती अचूक व पारदर्शक राहावी, एका विद्यार्थ्याची नोंद एकापेक्षा अधिक शाळांमध्ये होऊ नये आणि शैक्षणिक व्यवस्थापन अधिक सक्षम व्हावे यासाठी आधार संलग्नीकरणाची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले, विद्यार्थीहित, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिक्षकांच्या हिताचा समतोल राखत शालेय शिक्षण विभाग विविध सुधारणा राबवत आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा ७३ टक्के प्रवेश पूर्ण झाले असून, मागील वर्षीच्या तांत्रिक अडचणी दूर करून यंदा प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. खासगी क्लासेसचे नियमन करण्यासाठी विद्यार्थी व पालकांच्या हिताचा विचार करून स्वतंत्र कायद्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांसह इतर राज्यांच्या अनुभवाचाही त्यात समावेश करण्यात येणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
 

संबंधित सामग्री

शिक्षक भरतीची कागदपत्र तपासणी सुरू

शिक्षक भरतीची कागदपत्र तपासणी सुरू

Teacher Recruitment: शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली

Sep 04, 2026
जिल्ह्यातील  जिल्हा परिषद कांत्राटी शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा; शिक्षक सेनेची मागणी

जिल्ह्यातील  जिल्हा परिषद कांत्राटी शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा; शिक्षक सेनेची मागणी

ZP Contract Teacher: शिवसेना शिंदे गट गटाच्या सचिव व प्रवक्ता तसेच विदर्भ विभागीय संपर्क मंत्री मनीषा ताई कायंदे विधानपरिषद आमदार यांचा नुकताच गडचिरोली येथे दौरा आयोजित

Aug 12, 2026
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी 30 हजार 209 रिक्त पदांची जाहिरात

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी 30 हजार 209 रिक्त पदांची जाहिरात

Pavitra Portal Teacher Recruitment: महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती प्रक्रिया राबव

Aug 07, 2026
जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नतीला आता वेळेचे बंधन; शासनाची कालबद्ध कार्यपद्धती जाहीर

जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नतीला आता वेळेचे बंधन; शासनाची कालबद्ध कार्यपद्धती जाहीर

Zilla Parishad Teacher: जिल्हा परिषद आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विस्तार अधिकारी शिक्षण, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक अशा विविध पदांवर होणाऱ्या पदोन्नतीसाठी महाराष्ट्र शासन

Jul 29, 2026
परभणीतील ग्रामीण शिक्षणाच्या हक्कासाठी आ.डॉ.गुट्टेंनी उठवला आवाज !

परभणीतील ग्रामीण शिक्षणाच्या हक्कासाठी आ.डॉ.गुट्टेंनी उठवला आवाज !

गंगाखेड मतदारसंघातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या मोठी असूनही इयत्ता आठवीचे वर्ग सुरू करण्यात आलेले नाहीत.

Jun 30, 2026