'हर हर महादेव' जयघोष

तब्बल दीड लाखाहुन अधिक भाविकांनी घेतले श्री क्षेत्र औंढा नागनाथाचे दर्शन

Shri Aundha Nagnath: आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे श्रावणातील पहिल्या सोमवारी व त्यातच आलेल्या नागपंचमी निमित्त हर हर महादेव बम बम भोले च्या जय घोषात दीड लाखावर भाविकांनी दर्शन

तब्बल दीड लाखाहुन अधिक भाविकांनी घेतले श्री क्षेत्र औंढा नागनाथाचे दर्शन

Shri Aundha Nagnath

औंढा नागनाथ (Shri Aundha Nagnath) : येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे श्रावणातील पहिल्या सोमवारी व त्यातच आलेल्या नागपंचमी निमित्त हर हर महादेव बम बम भोले च्या जय घोषात दीड लाखावर भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता हर हर महादेवाच्या जयघोषाने दिवसभर औंढा नागनाथ येथे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. 

तत्पूर्वी पहाटे एक वाजता मंदिर संस्थांचे अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे, शोभा गाडे, पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, सरला डोंगरे, मंदिराचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ,वर्षा डफळ यांच्या हस्ते सपत्नीक श्री नागनाथाची दुग्ध अभिषेक करत शासकीय महापूजा पार पडली यानंतर उत्तर रात्री दोन वाजता (Shri Aundha Nagnath) श्री नागनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी बम बम भोले हर हर महादेवाच्या गजरात दीड लाखावर भाविकांनी श्री नागनाथाचे दर्शन घेतले.

दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहता गर्भ ग्रहातील सर्व अभिषेक बंद करण्यात आले होते. तर मंदिर संस्थान कडून आलेल्या भाविकांना रांगेत पाण्यासह सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. भाविकांची प्रचंड गर्दी वाढल्याने पोलीस प्रशासनाकडूनही या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी सकाळी अकरा वाजे दरम्यान मंदिरास भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला व (Shri Aundha Nagnath) श्री नागनाथाचे दर्शन घेतले. कोणत्याही शिवभक्त भाविकांना अडचण भासू नये यासाठी मंदिराचे अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे, पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे मंदिर व परिसरात फिरून आढावा घेत होते.

पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, मंदिराचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, मंदिर सुरक्षा प्रमुख बबन सोनूणे,पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार दिलीप नाईक, जमादार रविकांत हरकाळ,शाहेद सय्यद, किशोर पारीसकर,तानाजी ढाकरे, रमेश मस्के, ओंकारेश्वर रांजणेकर, यांच्यासह दोनशे वर पोलीस कर्मचारी, होमगार्ड, पोलीस पाटील, मंदिर कर्मचारी, एस आर पी दोन प्लॉटून यांनी मंदिरात चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे गर्दीवर लक्ष होते दिवसभरात दीड लाखावर शिवभक्तांनी श्री नागनाथाचे दर्शन (Shri Aundha Nagnath) घेतल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे यांनी दिली.

संबंधित सामग्री

औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद 

औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद 

Aundha Nagnath Temple closed: औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिराच्या परिसरातील आतील गर्भगृहातील दुरुस्तीचे काम सहायक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Oct 02, 2026
श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; दर्शनासाठी सहा ते सात तास रांगा

श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; दर्शनासाठी सहा ते सात तास रांगा

हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरू असल्याने शनिवार, रविवार तसेच श्रावण सोमवारी श्री नागनाथाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होत आहे.

Aug 22, 2026
पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी घेतले औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन 

पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी घेतले औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन 

SP Shrenik Lodha: येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे हिंगोलीचे नूतन पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी पूजा अभिषेक करत दर्शन घेतले व हेमाडपंथी मंदिराची पहाणी

Jul 14, 2026
औंढ्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची पेढे विक्रेत्यांवर धडक कारवाई

औंढ्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची पेढे विक्रेत्यांवर धडक कारवाई

Food and Drug Department: अन्न व औषध प्रशासनाचा मिठाई विक्रेत्यांवर धडक तपासणी करून साठलेल्या अनन्याचा विश्लेषण करण्यात आला. 93 किलोचे नष्ट करण्यात आले आहेत.

Jul 03, 2026
सोमवती अमावस्या निमित्त ज्योतिर्लिंग श्री नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

सोमवती अमावस्या निमित्त ज्योतिर्लिंग श्री नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

Jyotirlinga Shri Nagnatha: सोमवतीच्या ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आठव्या ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात 15 जूनला मोठ्या संख्येने भक्तांनी गरद्या केली.

Jun 15, 2026