ऑपरेशन नो रॉंग साईड

‘ऑपरेशन नो रॉंग साईड’ मोहिमेला वेग; नागपुरात रॉंग साईड वाहनचालकांवर 44 गुन्हे दाखल

Operation No Wrong Side: विरुद्ध दिशेने (रॉंग साईड) वाहन चालविल्यामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी नागपूर शहर वाहतूक शाखेने ‘ऑपरेशन नो रॉंग साईड’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत रॉंग साईड

‘ऑपरेशन नो रॉंग साईड’ मोहिमेला वेग; नागपुरात रॉंग साईड वाहनचालकांवर 44 गुन्हे दाखल

Operation No Wrong Side

 

अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांची कारवाई; नागरिकांना रॉंग साईड वाहन न चालविण्याचे आवाहन

नागपूर (Operation No Wrong Side) : विरुद्ध दिशेने (रॉंग साईड) वाहन चालविल्यामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी नागपूर शहर वाहतूक शाखेने ‘ऑपरेशन नो रॉंग साईड’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत रॉंग साईड वाहन चालविणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल करण्यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, पोलीस उपायुक्त (वाहतूक) आदित्य मिरखेलकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) गिरीश बने यांच्या मार्गदर्शनाखाली ही (Operation No Wrong Side) मोहीम राबविण्यात येत आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने वाहतूक नियमांचे पालन करण्यावर पोलिसांनी विशेष भर दिला आहे.

शॉर्टकटच्या नादात जीव धोक्यात

नागपूर शहरातील अनेक वाहनचालक वेळ वाचवण्यासाठी किंवा शॉर्टकटच्या नादात रॉंग साईडने वाहन चालवितात. मात्र, अशा प्रकारामुळे रस्त्यावरील पादचारी तसेच इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात येतो. (Operation No Wrong Side) रॉंग साईडमुळे होणाऱ्या अपघातांमुळे संबंधित कुटुंबांवर आर्थिक आणि मानसिक संकटही ओढवते. त्यामुळे रॉंग साईड वाहन चालविणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

सोनेगाव वाहतूक परिमंडळात 44 गुन्हे दाखल

सोनेगाव वाहतूक परिमंडळाच्या हद्दीत ‘नो रॉंग साईड’ (Operation No Wrong Side) मोहिमेअंतर्गत 22 ऑगस्ट 2025 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत रॉंग साईड वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281 अन्वये एकूण 44 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढेही रॉंग साईड वाहन चालविणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

नागरिकांना वाहतूक पोलिसांचे आवाहन

सोनेगाव वाहतूक विभागाने शहरातील नागरिकांना रॉंग साईडने वाहन चालवू नये, असे आवाहन केले आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास गंभीर अपघात आणि जीवितहानी टाळण्यास मदत होईल. सोनेगाव वाहतूक परिमंडळातील बिट अधिकारी, अंमलदार आणि पेट्रोलिंग मोबाईलच्या माध्यमातून सातत्याने गस्त घालण्यात येत असून, रॉंग साईड वाहनचालकांवर नियमित कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. (Operation No Wrong Side) वाहतूक नियमांचे पालन करा, रॉंग साईड टाळा आणि स्वतःसह इतरांचेही प्राण सुरक्षित ठेवा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

संबंधित सामग्री

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026
नागपूरकरांनो, लक्ष द्या! गणेश आगमनासाठी २५ तास वाहतुकीत मोठे बदल

नागपूरकरांनो, लक्ष द्या! गणेश आगमनासाठी २५ तास वाहतुकीत मोठे बदल

गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील महाल-चितार ओळी परिसरात २५ तास वाहतूक बदल; पोलिसांनी पर्यायी मार्ग जाहीर केले.

Sep 13, 2026
नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसक घटनेत होऊन 38 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Sep 05, 2026
नागपुरातील DJ बंदीवरून भाजपमध्येच मतभेद; संदीप जोशींची कायमस्वरूपी बंदीची मागणी, नांगरे पाटलांची भूमिका स्पष्ट

नागपुरातील DJ बंदीवरून भाजपमध्येच मतभेद; संदीप जोशींची कायमस्वरूपी बंदीची मागणी, नांगरे पाटलांची भूमिका स्पष्ट

नागपुरातील डीजे बंदीच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली.

Sep 04, 2026
नागपुरात गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीवर बंदी; ३ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

नागपुरात गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीवर बंदी; ३ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

नागपूर शहरात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे.

Sep 03, 2026