SIT च्या रडारवर ‘ती’ अधिकारी! खरात प्रकरणात धक्कादायक लिंक उघड

नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे तपशील समोर येत असून तपासाची व्याप्ती अधिकच वाढताना दिसत आहे.

SIT च्या रडारवर ‘ती’ अधिकारी! खरात प्रकरणात धक्कादायक लिंक उघड

Political Links

भोंदू अशोक खरात प्रकरणात ‘पॉवरफुल’ महिला अधिकाऱ्याची एंट्री

(Political Links) नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे तपशील समोर येत असून तपासाची व्याप्ती अधिकच वाढताना दिसत आहे. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातची विशेष तपास पथकाकडून (SIT) सखोल चौकशी सुरू आहे. या चौकशीतून राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, बांधकाम व्यावसायिक तसेच काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे समोर येत असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

या पार्श्वभूमीवर आता एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. तपास यंत्रणांच्या रडारवर एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचे नाव आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नाशिकमध्ये कार्यरत असताना या अधिकाऱ्याने अशोक खरातला प्रशासकीय स्तरावर मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. SIT च्या तपासात या संबंधातील काही धागेदोरे हाती लागल्याचे समजते.

विशेष म्हणजे, या मदतीच्या बदल्यात अशोक खरातने आपल्या संपर्कांचा वापर करून संबंधित महिला अधिकाऱ्याला इच्छित ठिकाणी बदली मिळवून दिल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे दोघांमध्ये आर्थिक देवाणघेवाण झाली का, याचाही तपास सुरू आहे. या दिशेने SIT अधिक खोलवर चौकशी करत असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अशोक खरातने दिलेल्या जबाबाच्या आधारे तपास यंत्रणांनी शिर्डी नगरपंचायतीतील काही माजी पदाधिकाऱ्यांनाही नोटिसा पाठवल्या आहेत. यात माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि काही माजी नगरसेवकांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी दोन माजी नगराध्यक्षांनी SIT समोर हजर राहून आपले जबाब नोंदवले असल्याची माहिती समोर आली आहे.

एकूणच, अशोक खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणातील गुंतागुंत वाढत असून अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावे पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026