नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

राज्यात पुढील 4 दिवस वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा !

Maharashtra Heavy Rain: भारतीय हवामान विभागाने राज्यात 20 ते 24 एप्रिलदरम्यान वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले गेले आहे

राज्यात पुढील 4 दिवस वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा !

Maharashtra Heavy Rain

मुंबई (Maharashtra Heavy Rain) : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) पाच दिवसीय अंदाजानुसार राज्यातील विविध भागांत 20 ते 24 एप्रिलदरम्यान वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या भागांतील जिल्ह्यांनी अधिक दक्षता बाळगावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

नागरिकांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करावे:

  • विजांचा कडकडाट ऐकू आला किंवा वीज चमकताना दिसताच तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
  • झाडाखाली, मोकळ्या शेतात, (Maharashtra Heavy Rain) पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे.
  • मोकळ्या जागेत मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळावा.
  • निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून खाली बसून राहावे.

प्रशासनासाठी उपाययोजना

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत:

  • ग्रामपंचायत, पोलीस व आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावी.
  • रुग्णवाहिका, अग्निशमन दल व आपत्कालीन पथके तयार ठेवावीत.
  • शाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यात.
  • हवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावपातळीपर्यंत त्वरित पोहोचवावेत.

शेतकरी व आयोजकांसाठी विशेष सूचना

  • शेतकरी बांधवांनी विजांच्या इशाऱ्याच्या (Maharashtra Heavy Rain) काळात शेतातील कामे टाळावीत
  • बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे
  • यात्रा, धार्मिक कार्यक्रम व मोठ्या गर्दीचे आयोजन पुढे ढकलावे

अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026