चंद्रपूर उज्ज्वला सोयाम

चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयाम यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

Chandrapur Ujjwala Soyam: उज्ज्वला सोयाम, चंद्रपूरच्या नर्सला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित केले गेले, नक्षल प्रभावित भागातील आरोग्यसेवेसाठी प्रशंसा.

चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयाम यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

Chandrapur Ujjwala Soyam

 

राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित

चंद्रपूर (Chandrapur Ujjwala Soyam) : महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्यसेवेची मशाल तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयाम (Chandrapur Ujjwala Soyam) यांचा नवी दिल्ली येथे गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस 2026 निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात, राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू (President Daupradi Murmu) यांच्या हस्ते उज्ज्वला सोयाम यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. या विशेष सोहळ्यात देशभरातून निवडक एकूण 15 नर्सिंग अधिकारी कर्मचारी यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव उपस्थित होत्या.

चंद्रपूर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या उज्ज्वला सोयाम (Chandrapur Ujjwala Soyam) यांनी गेल्या 24 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात अत्यंत समर्पित सेवा दिली आहे. विशेषतः नक्षल प्रभावित आणि आदिवासी भागामध्ये कन्याभ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि आरोग्य जनजागृतीमध्ये घेतलेला पुढाकार गौरवास्पद आहे. नैसर्गिक आपत्ती प्रवणक्षेत्र असो किंवा कठीण भौगोलिक परिस्थिती, उच्च जोखीम असलेल्या गर्भवती मातांची आणि बालकांची काळजी घेण्यात त्यांनी नेहमीच तत्परता दाखवली आहे.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवसाची संकल्पना ‘आमच्या परिचारिका, आमचे भविष्य: सक्षम परिचारिका जीव वाचवतात’ अशी ठेवण्यात आली होती. या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र आणि 1 लाख रुपये रोख असे आहे.

संबंधित सामग्री

अमेरिकेचा मोठा निर्णय; भारतातील औषधांवरील अतिरिक्त शुल्क रद्द!

अमेरिकेचा मोठा निर्णय; भारतातील औषधांवरील अतिरिक्त शुल्क रद्द!

Medicines Zero percent duty: अमेरिकेने भारतासह 20 देशांतून आयात होणाऱ्या काही विशेष औषधे आणि त्यांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या घटकांवरील ‘अ‍ॅड व्हॅलोरम’ शुल्कातून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 01, 2026
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ११ जणांना १.४४ कोटींचा गंडा

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ११ जणांना १.४४ कोटींचा गंडा

शेअर ट्रेडिंगमध्ये १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून चंद्रपुरातील ११ जणांकडून १ कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप.

Sep 26, 2026
गांधींच्या वर्धा जिल्ह्याला हादरवणारी घटना; तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

गांधींच्या वर्धा जिल्ह्याला हादरवणारी घटना; तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

वर्ध्यात 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप; पाच अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल. रेल्वे स्थानकातील CCTV आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू.

Sep 26, 2026
विदर्भाला महामार्गांची मोठी भेट; 4 प्रकल्पांना मंजुरी, 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी

विदर्भाला महामार्गांची मोठी भेट; 4 प्रकल्पांना मंजुरी, 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी

पूर्व विदर्भातील 4 महामार्ग प्रकल्पांना मंजुरी; 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरला मोठा फायदा अपेक्षित.

Sep 24, 2026
भद्रावती शहर हादरले! भर चौकात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

भद्रावती शहर हादरले! भर चौकात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

भद्रावतीत भर चौकात ४० वर्षीय उमदेव मेश्राम यांची धारदार शस्त्राने हत्या. अज्ञात आरोपींचा शोध सुरू; पोलिसांकडून तपासाला वेग.

Sep 23, 2026