X Post Controversy

सुनेत्रा पवारांवरील 'गुंगी गुडीया' पोस्टवरून राजकारण तापले; काँग्रेसला माफीची मागणी

महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा सोशल मीडिया पोस्टमुळे वादाची ठिणगी पडली आहे.

सुनेत्रा पवारांवरील 'गुंगी गुडीया' पोस्टवरून राजकारण तापले; काँग्रेसला माफीची मागणी

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा सोशल मीडिया पोस्टमुळे वादाची ठिणगी पडली आहे. बीडमधील एका पत्रकार परिषदेसंदर्भातील व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्र काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सत्ताधारी महायुतीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसने आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर सुनेत्रा पवार यांचा उल्लेख 'गुंगी गुडीया' असा केल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे.

काँग्रेसने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, "सुनेत्रा पवार, अजून किती दिवस 'गुंगी गुडीया' बनून राहतील?" असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. बीड येथे झालेल्या पत्रकार परिषदेतला व्हिडिओ पोस्ट करत ही टीका करण्यात आली.

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी फोनवरून प्रतिक्रिया देत काँग्रेसच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला. संबंधित पोस्ट तातडीने हटवावी आणि काँग्रेसने सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

मिटकरी यांनी या वादावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, बीडमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर तेच प्रश्न वारंवार विचारले जात असल्याने सुनेत्रा पवार यांनी बोलणे थांबवले होते. मात्र, काँग्रेसने त्या व्हिडिओचा विपर्यास करून चुकीचा अर्थ लावत टीका केल्याचा आरोप त्यांनी केला.

नेमका वाद कशामुळे?

महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडियावर बीडमधील पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बोलण्यापासून थांबवत असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. याच संदर्भातून काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांचा 'गुंगी गुडीया' असा उल्लेख केला. या पोस्टनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

अमोल मिटकरींची काँग्रेसवर टीका

वादग्रस्त पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यांनी महिला उपमुख्यमंत्र्यांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य असल्याचे सांगितले. या वक्तव्याबद्दल काँग्रेसने तातडीने माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

इंदिरा गांधी आणि सोनिया गांधींचा उल्लेख

काँग्रेसवर टीका करताना अमोल मिटकरी यांनी पक्षाच्या महिला नेतृत्वाचाही संदर्भ दिला. देशाला इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांसारखे महिला नेतृत्व देणाऱ्या काँग्रेसकडून महाराष्ट्रातील एका महिला उपमुख्यमंत्र्यांबाबत अशा प्रकारची हीन पातळीवरील भाषा वापरली जाणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.

संबंधित सामग्री

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

Congress MP Varsha Gaikwad: नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून काँग्रेस खासदार प्रा. वर्षा गायकवाड..

Oct 05, 2026