Korchi :- शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा यासाठी कृषी विभागामार्फत (Department of Agriculture) ‘महाविस्तार एआय ॲप’ सुरू करण्यात आले असून या ॲपचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री. नागेश मिसाळ यांनी केले.
‘महाविस्तार एआय ॲप’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) आधारित असून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते. या ॲपमध्ये मराठी भाषेतील ‘चॅटबॉट’ सुविधा उपलब्ध आहे. शेतकरी शेतीतील समस्यांबाबत या चॅटबॉटला प्रश्न विचारू शकतात आणि काही सेकंदांत अचूक उत्तरे मिळवू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचून योग्य वेळी योग्य निर्णय घेणे शक्य होईल.
ॲपमधील महत्त्वाच्या सुविधा
-
पीक व्यवस्थापन
-
पीक संरक्षण
-
खतांचा वापर
-
हवामानाचा अंदाज
-
बाजारभाव
-
नवीन तंत्रज्ञान
-
शासकीय योजनांची माहिती
या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन सहज उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊन आपल्या शेतीत प्रगती साधावी, असे आवाहन मिसाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार प्रशांत गडृम होते. या वेळी तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ, कृषी विभागातील कर्मचारी तसेच तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी मंडळ कृषी अधिकारी ज्ञानेश्वर मसराम यांनी केले.