कन्हान परिसरात पुन्हा गुन्हेगार डोकेवर काढ त असल्याने नागरिकात भितीचे वातावरण
कन्हान (Kanhan Murder Case) : नरहरी सोनार नगर कांद्री-कन्हान येथील रहिवासी महेंद्र बर्वे यांची कुणीतरी अज्ञात आरोपीनी रात्रीला पानतावने कॉलेज जवळील हरडे लेआऊटच्या जागेतील रस्त्यावर रात्री चाकुने वार करून व दगडाने ठेचुन निर्दयी हत्या (Kanhan Murder Case) करण्यात आली. या घटनेने चांगली खळबळ उडाली असून, नविन वर्षात दोन हत्या झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षितेमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल रविवारला रात्री महेंद्र टिकाराम बर्वे हा रात्री जेवण करून फिरायला गेला होता. परंतु रात्री घरी परत आलाच नाही. सकाळी स्थानिक नागरिकांना पानतावने कॉलेज जवळील हरडे लेआऊटच्या जागेतील रस्त्यावर मृतदेह आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली. कन्हान पोलीसांना (Kanhan Police) माहिती मिळताच घटनास्थळी पोहचुन पाहिले असता, महेंद्र बर्वे यांची कुणीतरी अज्ञात आरोपीनी चाकुने सपासप वार करून रक्तबंबाळ करीत डोक्यावर मोठया दगडाने ठेचुन निर्दयी हत्या (Kanhan Murder Case) केल्याचे पोलीसांच्या निर्दशनात आले. पोलीसानी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरिय तपासणी करिता (Mayo Hospital Nagpur) मेयो शासकिय रूग्णालय नागपुर येथे पाठविले आहे.
महेंद्र बर्वे हा नगरपंचायत कांद्री येथील कंत्राटी कर्मचारी असुन, लोकांना व्याजाने पैसे दयाचा. पैश्याच्या देण्या-घेण्याच्या कारणावरून काही लोकानी त्यास रात्री बोलावुन पैश्याच्या वादात भांडण करून, त्याच्यावर चाकुचे सपासप वार केल्याने तो रक्तबंबाळ होऊन खाली पडला. खाली पडल्यावर त्याच्या डोक्यावर मोठया दगडाने ठेचुन निर्दयी हत्या (Kanhan Murder Case) केली असल्याचे, नागरिकात चर्चा आहे. कन्हान पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील व स्थागु अशा नागपुर ग्रामिण पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पुढील तपास करीत संशयित दोन आरोपीना ताब्यात घेतले असुन, हत्येचे कारण व आरोपीचा शोध घेत आहेत.
कन्हान पोलीस स्टेशन (Kanhan Police) अंतर्गत २०२५ या नविन वर्षात (दि.१५) फेब्रुवारीला कोळसा खदान नं. ६ रात्री दारूडया मुलाने जन्मदात्या आईला मारहाण करून हत्या केली. (दि.२३) मार्चच्या रात्री युवकास चाकुने वार व दगडाने ठेचुन हत्या (Kanhan Murder Case) केल्याने गुन्हेगार डोकवर काढत असल्याने परिसरातील नागरिकात चांगलेच भितीचे वातावरण निर्माण झाली आहे. आज दुपारी (Kanhan Police) नागपुर ग्रामिण पोलीस अ़धिक्षक हर्ष पोद्दार हयानी घटनास्थळी भेट देऊन, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, स्थागुअशाना. ग्रामिण पो नि. ओमप्रकाश कोकाटे व कन्हान पोनि राजेंद्र पाटील याना तात्काळ आरोपीना अटक करून, योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.