महसुली प्रशासन राज्य शासनाचा चांगला चेहरा बनविण्यासाठी, सर्वसामान्यांच्या अडचणी वेळेत सोडविण्याला प्राधान्य द्यावे- अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी
हिंगोली (Majhi Ladki Bahin Yojana) : जिल्हा प्रशासनाकडून आजपासून (Revenue administration) महसूल दिन तर प्रथमच महसूल पंधरवाडा आयोजित करण्यात आला असून, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध भागातून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि अडचणी समजून घेत त्या सोडविण्याला प्राधान्य देऊन त्या वेळेत सोडवाव्यात. त्यामुळे जनमाणसांत महसुली प्रशासन राज्य शासनाचा चांगला चेहरा बनेल, असे प्रतिपादन (Collector Khushal Singh Pardeshi) अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले.
जिल्ह्यात महसूल पंधरवाड्याला सुरुवात
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज महसूल दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अपर (Collector Khushal Singh Pardeshi) जिल्हाधिकारी परदेशी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) समाधान घुटुकडे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुषा मुथा, उप जिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, लेखाधिकारी शोभा मुंडे, तहसीलदार नवनाथ वगवाड, उज्वला पांगारकर, गटविकास अधिकारी डी. आय. गायकवाड उपस्थित होते.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणांतर्गत दोन उमेदवारांना नियुक्ती पत्राचे वाटप
आजपासून सुरू होत असलेल्या (Revenue administration) महसूल पंधरवाड्यात जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची कामे करण्याची संधी मिळणार असून, त्यांची ती कामे प्राधान्याने मार्गी लावावीत. ‘सैनिकहो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमातून सैनिकांची कामे पूर्ण करा, कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके, कार्यालयातील महत्त्वाच्या सर्व नोंदी अद्ययावत करा. त्याच बरोबर कार्यालय स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन करून वृक्षारोपण, ई-प्रणाली, फेरफार, वंचित घटकांची कामे प्राधान्याने पूर्ण करा. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली शैक्षणिक व इतर प्रमाणपत्रे, कागदपत्रे मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अशीच कार्यप्रणाली राबवून महसूल पंधरवाड्यात ही कामे पूर्ण करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी परदेशी यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी प्रास्ताविकातून महसूल दिन आणि पंधरवाडा आयोजनामागची भूमिका आणि करावयाच्या कार्यवाहीबाबतची सविस्तर माहिती विशद केली. यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा देऊन महसूल प्रशासन व संबंधित विभागाच्या माध्यमातून महसूल पंधरवाड्यानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांत मुख्यमंत्री माझी लाकडी, युवा कार्य प्रशिक्षण योजना यासह विविध योजनेचा जास्तीत जास्त लोकांना कसा लाभ देता येईल यासाठी माहिती, मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा यांनी महसूल विभागाचे स्वरुप बदलत असून ते लोकाभिमुख महसूल प्रशासन म्हणून काम करत असल्याचे सांगून महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. एकात्मिक विभागाचे बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल चव्हाण यांनी (Majhi Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती व येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात याबाबत मार्गदर्शन केले.
कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी कौशल्य विकास विभागाच्या वतीने बेरोजगार युवकांना रोजगारांच्या संधी आणि उद्योजकांना मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचे काम करत आहे. राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना शासकीय, निमशासकीयसह खाजगी कार्यालयात कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत शंभर टक्के काम केलेल्या अंगणवाडी सेविकांचा केला गौरव
यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे (Majhi Ladki Bahin Yojana) शंभर टक्के अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया पूर्ण केलेल्या हिंगोली तालुक्यातील वाढोणा येथील अंगणवाडी सेविका सुरेखा दत्ता भोयर आणि देवळगाव येथील दुर्गा नागोराव जगताप यांचा अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणांतर्गत दोन उमेदवारांना नियुक्ती पत्राचे वाटप
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणांतर्गत कौशल्य विकास विभागामध्ये युवा कार्य प्रशिक्षणासाठी अभिजीत अरविंद अलोने यांना तर मत्स्य व्यवसाय विभागामध्ये युवा कार्य प्रशिक्षणासाठी संदीप पंजाब डुडुळे यांना अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांच्या हस्ते रुजू आदेश देण्यात आले.
आधार नोंदणीसाठी विशेष शिबीर
महसूल दिन आणि (Revenue administration) महसूल पंधरवाड्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे आधार नोंदणी विशेष शिबीर, आपले सरकार सेवा केंद्र व सीएससी केंद्र विविध सेवेसाठी सुरु करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणीही हेल्प डेस्क सुरु करुन सुविधा देण्याचे तसेच विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. एकात्मिक बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विशाल चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी आभार मानले.