Wardha :- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमास (murderous) २० वर्षांच्या सश्रम कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. हा निकाल जिल्हा न्यायाधीश ३ एस. एम. मेनजोगे यांनी दिला.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमास २० वर्षांच्या सश्रम कारावास
न्यायालयाने आरोपी सुशिल गुलाबराव सरदार (वय ४२) यास विविध कमलान्वये शिक्षा ठोठावली. घटनेची थोडक्यात हकीगत अशी की, आरोपी सुशिल सरदार याने पीडितेवर अत्याचार केला. घटनेबाबत कोणाला सांगितल्यास आरोपीने पीडितेला मारण्याची धमकी दिली. पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता फिर्यादीस घटनेची माहिती सांगितली. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल केला. सदर प्रकरणाचा तपास सावंगी (मेघे) येथील पोलिस उप-निरीक्षक अनुराधा फुकट यांनी केला. आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे दोषारोपपत्र न्यायालयात (Courts) दाखल केले. सरकारतर्पेâ जिल्हा सरकारी वकील गिरीश तकवाले यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी महिला पोलीस हवालदार अश्विनी वानखेडे यांनी साक्षदारांना न्यायालयात हजर करून कामगिरी बजावली. प्रकरणात शासनातर्फे ९ साक्षीदार तपासले.