तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे!
अन्यथा भुली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा
मानोरा (Manora Agriculture) : तालुक्यातील फुलउमरी सर्कलमध्ये हुमणी अळीच्या प्रादुर्भाव मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती पडीत पडली आहे. याबाबत तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी नुकसानीची पाहणी केली. (Manora Agriculture) प्रशासन मार्फत शासनाला पाठपुरावा करून सुद्धा पंचनामा करण्यास अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नाही. येत्या २६ ऑगस्ट पर्यंत जर पंचनामा करण्यास सुरुवात न केल्यास दुसऱ्या दिवशी बुधवारला भुली फाटा येथे रास्ता रोको करण्यात येईल, असे इशाऱ्याचे निवेदन तहसीलदार यांना माजी जि. प. सदस्या सौ. सुरेखा अशोक चव्हाण व शेतकऱ्यांनी दिले आहे.
यावर्षी तालुक्यासह फुलउमरी सर्कलमधील फुलउमरी, सोमेश्वरनगर, उमरी खुर्द, रंगपट्टी, भुली, हातना, हातोली, आमदरी आदी गावातील शेत शिवारात हुमनी अळीने पिक पोखरल्याने अनेक (Manora Agriculture) शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकामध्ये रोटावेटर व ट्रॅक्टर फिरविल्याने शेती रिकामी झाली आहे. तर शेकडो शेतकऱ्यांचे शेतातील उभे पिक सोकून गेले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदार डॉ संतोष यावलीकर व कृषी अधिकारी उमेश राठोड यांना अवगत केल्यावर त्यांनी शेतातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून आहे.
मात्र प्रशासनाने शासनाला कळवून देखील दहा दिवसाचा कालावधी उलटला तरी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले नाही. त्यामुळे याबाबत शासन व प्रशासनाने दखल घेऊन हुमणी अळीच्या प्रकोपाने नुकसान झालेल्या बाधीत (Manora Agriculture) क्षत्रातील पिकांचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे, अन्यथा शेतकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.