Manora :- लेखकाने (writer) समाजातील वास्तव आणि मानवाच्या व्यक्त होणाऱ्या भावना हे आपल्या साहित्यातून जागृत केले पाहिजेत, साहित्यिकांनी कुठलाही सामाजिक भेदभाव न करता तळागाळतील लोकांचे वास्तविक चित्रण आपल्या साहित्यातून मांडणी करणे हेच खरे साहित्य असते. म्हणुन ग्रामीण भागातील युवकांनी सतत लिखाण करणे करावे. महात्मा फुले (Mahatma Phule) यांचे पुस्तक पंचवीस तीस पानाचेच आहे. पण त्यामध्ये जे विचार आहे ते फार मोलाचे आहे. असे मोलाचे मार्गदर्शन बहुजनांचे नेते माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी केले.
सोहळ्याला साहित्य, समाजप्रबोधन आणि चिंतनशील विचारांचा संगम पाहायला मिळाला
ते पोहरादेवी येथील दि. २२ जुलै रोजी लेखक शंकर आडे यांच्या “सटरपटर” या नव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला साहित्य, समाजप्रबोधन आणि चिंतनशील विचारांचा संगम पाहायला मिळाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी अध्यक्षस्थानी पुस्तकाचे प्रकाशन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की “सामाजिक वास्तव आणि मानवी भावना या सहजपणे शब्दबद्ध करणे हेच चांगल्या साहित्याचे लक्षण आहे, आणि शंकर आडे यांचे लेखन त्याचे उत्तम उदाहरण आहे. असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश खडकीकर यांनी केले
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंजाब याडीकार यांनी “सटरपटर” पुस्तकातील कथा आणि भाषाशैलीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले, “हे पुस्तक तरुण पिढीसाठी प्रेरणादायक असून, समाजातील सूक्ष्म बाबींवर प्रकाश टाकणारे आहे. पुस्तकाचे लेखक शंकर आडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “‘सटरपटर’ हे माझ्या अनुभवांचे आणि निरीक्षणांचे संकलन आहे. यातून सामान्य माणसाच्या जगण्यातले क्षण टिपण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी याडीकार पंजाब चव्हाण, प्रा. प्रेमभाऊ राठोड, पत्रकार फुलसिंग नोले, इंजी. रतन पवार , पत्रकार हरीश खडकीकर , प्राचार्य जयसिंग राठोड , दुर्गेश राठोड पुसद , प्रकाश चव्हाण , इंजी रमेश पवार , डॉ रामराव राठोड, सुभाष पवार पुसद , आदींनी आपले विचार प्रगट केले. यावेळी जी प सदस्य रामराव चव्हाण , पत्रकार गणेश राठोड , कवी शांतिकुमार राठोड , पत्रकार मनीष दशरथकर, नारायण चव्हाण, पांडुरंग मनवर, कॉ. संजय बाजड, बापूराव साबळे, जयसिंग राठोड आर्णी, गणेश करमतोट आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश खडकीकर यांनी केले. कु राजश्री आडे हिने कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.