आता होणार राडा..; 'झिम्मा ३'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होताच कमेंट्स

'झिम्मा', 'झिम्मा २' नंतर आता 'झिम्मा' सिनेमाचा तिसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

आता होणार राडा..; 'झिम्मा ३'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होताच कमेंट्स

Jhimma 3

Jhimma 3 : 'झिम्मा', 'झिम्मा २' नंतर आता 'झिम्मा' सिनेमाचा तिसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 'झिम्मा ३' सिनेमाची घोषणा करत हेमंत ढोमे याने कॅप्शनमध्ये, 'आपला आनंदाचा खेळ 'यावेळी तिसराच आहे'!!! झिम्मा ३', असं लिहिलं आहे. यावर कमेंट करत अभिनेत्री वैदेही परशुरामी म्हणाली, 'वाह.. वाह.. राडा..', तर अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी यांनीदेखील कमेंट केली आहे. सिनेमाच्या दोन्ही भागांत सायली हिने भन्नाट भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता तिसऱ्या भागात काय कमाल प्रेक्षकांना अनुभवता येणार.. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 'झिम्मा ३' सिनेमाची घोषणा करत हेमंत याने अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याचा एका फोटो पोस्ट केला आहे.

अभिनेत्याच्या फोटो भोवती अनेक बॅग्स पडलेल्या दिसत  आहे.. सुटकेसेस, क्रिकेट बॅट आणि ते सूर्यफूल.. यामुळे यावेळीदेखील काहीतरी ट्विस्ट सिनेमात असेल असं दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'झिम्मा ३' सिनेमाची चर्चा रंगली आहे. 'झिम्मा ३' सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, हेमंत ढोमे दिग्दर्शित सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी अभिनेत्री क्षिती जोगची आहे.. सिनेमा १ जानेवारी २०२७ ला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.. त्यामुळे २०२७ या नव्या वर्षाची सुरुवात धमाकेदार सिनेमाने होणार असं म्हणायला हरकत नाही.

संबंधित सामग्री

ब्रह्मास्त्र 2’ची घोषणा...आलिया-रणबीर पुन्हा एकत्र!

ब्रह्मास्त्र 2’ची घोषणा...आलिया-रणबीर पुन्हा एकत्र!

Alia-Ranbir: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट (Alia-Ranbir) आणि रणबीर कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकण्याची शक्यता आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या भागात शिवा आणि ईशाच्या भूमिकेत

Aug 20, 2026
आता Gen Z साठी चित्रपटनिर्मितीत महाराष्ट्र शासनाचा सहभाग..

आता Gen Z साठी चित्रपटनिर्मितीत महाराष्ट्र शासनाचा सहभाग..

Gen Z Filmmaking: मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीचा, विशेषतः जेन झी प्रेक्षकांचा वेध घेणारा आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स तांत्रिक माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या विशेष चित्रपट निर्मिती..

Aug 18, 2026
'सई टिकेल की नाही, शंका होती'; सुबोध भावेंचा मोठा खुलासा

'सई टिकेल की नाही, शंका होती'; सुबोध भावेंचा मोठा खुलासा

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

Aug 04, 2026
आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; सोशल मीडियावर अधिकृत घोषणा, मुलगी जिजासाठी Co-parenting करणार

आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; सोशल मीडियावर अधिकृत घोषणा, मुलगी जिजासाठी Co-parenting करणार

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता-निर्माता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर यांनी वैवाहिक आयुष्याबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे.

Jul 16, 2026
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि छायाचित्रकार आर. चेझियान यांचे निधन; वयाच्या 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि छायाचित्रकार आर. चेझियान यांचे निधन; वयाच्या 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक आणि प्रसिद्ध छायाचित्रकार आर. चेझियान यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 57 वर्षांचे होते.

Jul 10, 2026