गाव पुढाऱ्यांची वाढली डोकेदुखी!
मानोरा (Manora) : सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. काहींनी सरपंच पदासाठी चढाओढ सुरू केल्याने गाव पुढाऱ्यांची डोकेदुखी वाढली असुन, ग्रामीण भागात (Rural Areas) गावागावातील राजकारण तापत आहे. अनेक इच्छुक सरपंच पदाच्या उमेदवारीची दावेदारीमुळे गाव पुढाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. सन 2025 ते 2030 या कालावधीत निवडणूक पार पडणाऱ्या ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. थेट जनतेतून निवड होणारा सरपंच शिक्षित, निर्व्यसनी मनमिळावू स्वभावाचा शोध गाव पुढारीकडून घेतला जात आहे. तशी त्यासाठी फिल्डिंगही लावणे सुरू असताना, प्रत्येक गावात डझनभर इच्छुक सरपंच (Sarpanch) निवडणूक लढविण्यासाठी उडी मारत आहेत.
येत्या काही महिन्यातच ग्राम पंचायतीचा पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. अशा गावामध्ये राजकारण्याच्या चर्चा सुरू झाल्या असुन, आरक्षणावर उमेदवार निवडीवर भर दिला जात आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी धावपळ नको म्हणून आतापासूनच, गावातील विविध प्रलंबित प्रश्न, यासह शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ग्रामस्थांच्या (Villagers) गाठीभेटीवर भर दिला जात आहे.
तालुक्यातील 77 ग्राम पंचायतीचे आरक्षण जाहीर!
आपल्याच पक्षाचा व पार्टीचा उमेदवार सरपंच व्हावा, यासाठी गाव पुढाऱ्याकडून (Village Leaders) तयारी केली जात आहे. काहींनी तर पुरुषांचे आरक्षण न निघाल्याने आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारीला सुरुवात केली आहे. सरपंच निवडणुकीच्या (Sarpanch Election) अनुषंगाने आगामी काळात ग्रामीण भागात आणखीनच राजकारण तापण्याचे संकेत दिसत आहे. सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सरपंच पदाची (Sarpanch Post) आरक्षण सोडत जाहीर होताच राखीव सरपंच पदामुळे अनेकाना फटका बसला आहे. अनेक ठिकाणी इच्छुकाना फटका बसल्याने त्यांचा हिरमोड झाला. आता किमान आपला आघाडी किंवा पॅनलचा तरी सरपंच व्हावा, यासाठी जोर लावला जात आहे. जातीय समीकरण (Caste Equation), पॅनल मध्ये कोणकोणते उमेदवार घ्यावा, यासाठी जोर लावला जात असून हक्काचे मतदान (Voting) किती व इतर मतदानाची गाव पुढाऱ्यांच्या घरी आकडेमोड सुरू झाली आहे.