सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा व विद्यापीठ वक्तृत्व स्पर्धा उत्साहात.!
मानोरा (Manora) : स्थानिक मा. सु. पा. महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा व विद्यापीठ स्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे यांच्या मार्गदर्शनात माजी विद्यार्थी संघटना समिती व सांस्कृतिक समितीच्या वतीने दिनांक 17 फेब्रुवारी व 18 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा व विद्यापीठ वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली.
मान्यवरांच्या हस्ते सत्कार…
विद्यापीठ स्तरीय वकृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संस्थेचे सचिव महादेवराव ठाकरे व प्रा. देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन एस ठाकरे यांनी भूषविले तर वकृत्व स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. कांबळे , व प्रा आर के ठाकरे यांनी केले. वकृत्व स्पर्धेत विद्यापीठ (University) प्रक्षेत्रातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग अनेक वक्त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून विद्यार्थ्यांसमोर साक्षात उभे केले. स्पर्धेतील प्रत्येक वक्त्यांची शैली, छत्रपती शिवरायांच्या साहित्यावरील त्यांचा अभ्यास यासह अनेक बाबी समोर प्रेक्षक म्हणून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा अनुभव देत होत्या. वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक वत्सलाबाई नाईक महाविद्यालय पुसदची विद्यार्थिनी कु. सांस्कृतिक काळे हिने पटकाविला. रोख 2100 रुपये व प्रमाणपत्र देऊन तिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. द्वितीय क्रमांक मुंगसाजी महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थी रोशन जाधव यांनी मिळविला. 1501 रुपये व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते, तर तृतीय क्रमांक बुटले महाविद्यालय दिग्रसची विद्यार्थिनी कु. श्रुती बेहेरे हिने पटकाविला. रोख 1001 व प्रमाणपत्र देऊन तिचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार (Felicitation) करण्यात आला.
प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन…
संस्थेचे अध्यक्ष व वकृत्व स्पर्धेचे (Distortion Competition) उद्घाटक अरविंद पाटील इंगोले, संस्थेचे सचिव महादेवराव ठाकरे यांनी स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्यात. वकृत्व स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्यात. स्पर्धेत केवळ बक्षीस मिळविण्यासाठी सहभागी न होता त्या स्पर्धेतून मिळालेली विचार आपल्या जीवनात आत्मसात करण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना (Student) दिला. वकृत्व स्पर्धा कार्यक्रमाचे संचलन सांस्कृतिक समितीचे संयोजक डॉ. अली यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुनील काळे यांनी केले. वकृत्व स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सांस्कृतिक समितीचे सदस्य प्रा. डॉ. काजळकर, प्रा कु. रेखा इंगोले मॅडम, प्रा गणेश भोयर यांनी प्रयत्न केले. वकृत्व स्पर्धेला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 
		

