जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांचा तुघलकी कारभार
मोजलेल्या धानाच्या चुकार्यांबरोबरच बोनसची देखील प्रतिक्षा
सेंदूरवाफा (Farmer Paddy Purchase) : जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांच्या तुघलकी कारभारामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकर्यांची धान खरेदी वांध्यात आली असून धान खरेदीची (Farmer Paddy Purchase) मुदत संपत आल्याने हजारो शेतकरी शासकीय धान खरेदी पासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ज्यांचे धान मोजून झाले आहेत त्यांना चुकार्याची वाट असून शेतकर्यांना बोनसची देखील प्रतिक्षा आहे.
जून महिना जवळपास संपत आलेला असता उद्दिष्ट अभावी रब्बी हंगामाची खरेदी लिमिट थांबलेली आहे. शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामासाठी दिवस रात्र एक करून धानाचे उत्पन्न घेतले असून धान विक्री करिता रोज चकरा मारीत आहेत. खुल्या बाजारात भाव नसल्याने शेतकरी धान खरेदी केंद्रावर चकरा मारीत आहे. पण उद्दिष्ट (Farmer Paddy Purchase) अभावी शेतकर्यांची धान मोजणी होऊ शकत नाही याची कल्पना शासनाला असूनही हेतू पुरस्सर उद्दिष्टे देत नाही. यासंदर्भात शासन शेतकर्यांबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.
धान खरेदी न झाल्यामुळे शेतकर्यांसमोर पुढील हंगाम कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर बाबीकडे लोकप्रतिनिधींनी देखील दुर्लक्ष केले आहे. शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा याबाबतीत उदासीन आहेत. शेतकर्यांच्या समस्या लक्षात घेता (Farmer Paddy Purchase) जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी आहे.
जिल्हा मार्केटिंग कार्यालयात बोनसची रक्कम जमा झाली असे वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशित झाले. गोंदिया जिल्ह्यात शेतकर्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरूवात झाली. (Farmer Paddy Purchase) भंडारा जिल्ह्यात मात्र चौकशी झाल्याशिवाय बोनसचे पैसे शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार नाही असे डीएमओ कार्यालयातून सांगण्यात आले.