‘मराठा महासंग्राम’ची मागणी : ‘जोडे मारो’ आंदोलनाचा दिला इशारा
लातूर (Maratha Samaj) : मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणे सवलती व अनुज्ञेय लाभ देण्याबाबत वर्षभरापूर्वी शासन आदेश काढूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे (Maratha Samaj) मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणे सवलती व अनुज्ञेय लाभ तात्काळ द्या, अन्यथा ‘जोडे मारो’ आंदोलन केले जाईल, असा इशारा (Maratha Samaj) मराठा महासंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. राजकुमार सूर्यवंशी पाटील यांनी सरकारला दिला आहे.
याबाबत सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधितांना निवेदन दिले आहे. २५ जानेवारी २०२४ च्या निर्णयाप्रमाणे (Maratha Samaj) मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्रात प्रवेशीत विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणे सवलती व इतर अनुज्ञेय लाभ मिळावेत, अशी मागणी केली आहे. मराठा समाजातील विद्यार्थी आरक्षणाअभावी कोणत्याही शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहू नयेत, यासाठी इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सोयी-सुविधा व लाभ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहेत, असा आदेश निघाल्यापासून त्याची अंमलबजावणी होईल असे या आदेशात म्हटले होते. मात्र एक वर्ष झाल्यानंतरही अद्यापही (Maratha Samaj) मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व इतर अनुषंगिक अनुज्ञेय लाभ लागू केले नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.
येत्या आठ दिवसांत शासन निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास व (Maratha Samaj) मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणे सवलती व अनुज्ञेय लाभ न मिळाल्यास, संघटनेच्या वतीने ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अॅड. राजकुमार सूर्यवंशी पाटील यांनी या निवेदनात दिला आहे. निवेदनाच्या प्रती लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक व सर्व संबंधितांना पाठविल्या आहेत.