आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी!
परभणी (Marijuana Case) : परभणीतील गंगाखेड तालुक्यातील मौजे डोगरपिपळा येथील गांजा प्रकरणातील फरार आरोपीस सोमवार रोजीच्या मध्यरात्री 2 वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून गंगाखेड पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. या आरोपीस मंगळवार 1 जुलै रोजी गंगाखेड न्यायालयाने (Gangakhed Court) 2 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.
दिड लाख रुपये किंमतीचा 10 किलो गांजा व दुचाकी जप्त!
स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) व गंगाखेड पोलिसांनी सुमारे एक महिन्यापूर्वी 5 मे सोमवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे केलेल्या संयुक्त कार्यवाहीत अंदाजे दिड लाख रुपये किंमतीचा 10 किलो गांजा व दुचाकी जप्त (Seized Bike) करून दत्तराव सिताराम केजगीर रा. डोंगरपिंपळा याच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल (Filed a Case) झाल्यापासून फरार असलेला, दत्तराव सिताराम केजगीर हा गंगाखेड पोलिसांना मिळून येत नसल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजु मुत्येपोड, सपोउपनि सुग्रीव केंद्रे, पोह. लक्ष्मण कांगणे, पोह. निलेश भुजबळ, पोह. राहुल परसोडे, पोशि. परसराम गायकवाड, पोशि. शरद सावंत आदींच्या पथकाने सोमवार 30 जून रोजी रात्री रोजी मौजे डोंगरपिंपळा येथील शेत आखाड्यावर सापळा लावून मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास गु.र.न. 321/2025 कलम गुन्ह्यातील फरार आरोपी दत्तराव सिताराम केजगीर रा. डोंगरपिंपळा ता. गंगाखेड यास पकडून गंगाखेड पोलिसांच्या ताब्यात दिले. या आरोपीस मंगळवार 1 जुलै रोजी गंगाखेड न्यायाल्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सपोनि आदित्य लोणीकर हे करीत आहे.