ग्रामस्थांनी ०१ भरमार बंदुक पोलिसांना केली सुपूर्द
गडचिरोली (Naxal Entry Ban) : पोलीस विभागाच्यावतीने राबविण्यात येणार्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या योजनामुळे प्रभावित होऊन कोठी हद्दीतील मरकरणार येथील ग्रामस्थांनी (Naxal Entry Ban) नक्षल्यांना गावबंदी केली आहे. जानेवारी २०२४ पासून अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील एकूण ४० गावांनी नक्षल्यांना गावबंदी केली आहे.
नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. सन २००३ पासून शासनामार्फत (Naxal Entry Ban) नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास वृद्धींगत झाला आहे. यामुळेच सन २०२४ व २०२५ या दोन वर्षांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड उपविभागातील कवंडेसह एकुण ४० गावांनी नक्षल्यांना गावबंदीचा ठराव एकमताने संमत केला आहे.
दिनांक ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलीस दलामार्फत पोलीस स्टेशन, कोठी येथे घेण्यात आलेल्या जनसंपर्क बैठकी दरम्यान उपस्थित मरकणार येथील ५५ ते ६० ग्रामस्थांनी एकत्रित येऊन सर्वानूमते नक्षलवाद्यांना गावबंदी (Naxal Entry Ban) करुन त्याबाबतचा ठराच प्रभारी अधिकारी पोस्टे कोठी यांना सादर केला होता. यासोबतच मरकणार येथील ग्रामस्थांनी पोलीस दलावरील आपला विश्वास अधोरेखित करीत काल दिनांक ३० सप्टेंबर रोजी आयोजित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेदरम्यान ग्रामस्थांनी एकत्रित येऊन एकमताने नक्षल्यांना गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव पारीत करुन अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक यांना कोठी पोलीस ठाण्यात सुपूर्द केला आहे. यावेळी गावातील ७० ते ७५ नागरीक उपस्थित होते. यासोबतच गावातील नागरिकांनी ०१ भरमार बंदूक देखील पोलीस ठाण्यात सुपूर्द करुन नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढाईमध्ये आपण पोलीस दलाच्या बाजूने उभे आहोत असे आश्वासन दिले आहे.
वरीष्ठ अधिकार्यांनी गावकर्यांचे केले अभिनंदन
ही कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक, भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते तसेच पोस्टे कोठीचे प्रभारी अधिकारी पोउपनि, दिलीप गवळी व अधिकारी आणि अंमलदार यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर (Naxal Entry Ban) नक्षल गावबंदी ठराव करणार्या गावातील नागरिकांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज यांनी अभिनंदन केले असून, अबुझमाड जंगल परिसरातील इतर गावातील नागरिकांनी माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता स्वतःच्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहावे असे आवाहन केले आहे.