आयुक्ताच्या पत्राला केराची टोपली
गोंदिया (Marketing federation) : गोंदिया जिल्ह्यात मुख्यत: आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन (Marketing federation) या दोन अभिकर्ता संस्थांच्या माध्यमातून आधारभूत किंमतीमध्ये धानखरेदी केली जाते. दोन्ही संस्थांना गैर आदिवासी व आदिवासी असे क्षेत्र धानखरेदीसाठी निर्धारीत करण्यात आले आहे. मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून धानखरेदीसाठी देण्यात आलेल्या परवानगी धारक संस्था आदिवासी क्षेत्रात घुसखोरी करून धानखरेदी करीत आहेत. याचा फटका आदिवासी विकास महामंडळाला बसत आहे. या संदर्भात आदिवासी विकास महामंडळ व आरटीआय कार्यकर्ता (RTI activist) रोशन बडोले यांनी आयुक्ताकडे तक्रार केली. त्यानुरूप जिल्हा मार्केटिंग संस्थेला पत्र देवून हा प्रकार थांबविण्याच्या सुचना केल्या आहेत. असे असतानाही मार्केटिंग फेडरेशनच्या संस्था आदिवासी क्षेत्रात धानखरेदी करीत आहेत. त्यामुळे हा मुरजोरपणा कुणाच्या अभयदानातून सुरू आहे, असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.
गोंदिया जिल्ह्यात मुख्यत: धानपीक शेती होते. शेतकर्याचे शेतमाल विक्रीमध्ये फसवणूक होऊ नये, याकरीता शासनस्तरावर पणन विभागाच्या माध्यमातून मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन प्रमुख अभिकर्तांना धानखरेदीची परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही अभिकर्ताकडून संस्थांना धानखरेदीची परवानगी देण्यात येत असते. दोन्ही संस्थांना गैर आदिवासी व आदिवासी अशी विभागणी करून धानखरेदी करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्हा (Marketing federation) मार्केटिंग फेडरेशनच्या परवाना धारक संस्था आपल्या मनमर्जीने आदिवासी क्षेत्रात धानखरेदी करीत आहेत. हा प्रकार मागील खरीप व रब्बी हंगामात उघडपणे पहावयास मिळाला. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाकडून या बाबतची तक्रार आयुक्तासह शासनाकडे करण्यात आली होती. आयुक्ताने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला या बाबतची सहनिशा करून आदिवासी क्षेत्रात धानखरेदी कशी केली जात आहे, असा जबाब देखील मागविला होता. मात्र असे असतानाही रब्बी हंगामात सुध्दा मोठ्या प्रमाणात (Marketing federation) जिल्हा मार्केटिंगच्या अख्यात्यारित असलेल्या संस्थांनी आदिवासी क्षेत्रातून धानखरेदी केली आहे. याचा फटका आदिवासी विकास महामंडळाला बसत आहे.
आरटीआय कार्यकर्त्याच्या पत्राची दखल
सडक अर्जुनी येथील आरटीआय कार्यकर्ता (RTI activist) रोशन बडोले यांनी गैर आदिवासी व आदिवासी या क्षेत्रात कुणाला धानखरेदी करण्याची परवानगी आहे, या बाबत माहिती आयुक्ताकडे मागितली होती. त्याचबरोबर हा गैर प्रकार निदर्शनास आणून दिला होता. या पत्राची आयुक्ताने दखल घेतली असून (Marketing federation) जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला गैरप्रकार थांबविण्याच्या सुचना केल्याची माहिती आहे.