पोफाळी पोलीसाची कार्यवाही!
उमरखेड (Married Suicide) : मागील 3 महिन्यापूर्वी पोफाळी येथील विवाहितेने पतीच्या त्रासाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यासंबंधीत मृत विवाहितेचा भाऊ अनिल सुधाकर बेले (27) रा. जवळा ता. आर्णी याने पोफाळी पोलिसांना (Pofali Police) माहिती देऊन माझ्या बिहणीचा पती नामे अनिल सखाराम टारफे यांचे दुसर्या स्त्री सोबत प्रेम संबंध होते व याच वादातून माझी मृतक बहीण कल्पना हिला तो त्रास देत होता, असे वारंवार माझ्या बहीणीने फोनवर माझ्या आईला सांगितले पतीच्या मानसिक व शारीरिक त्रासाला (Physical Distress) कंटाळून माझ्या बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या मृत्यूस जबाबदार अनिल सखाराम टारफे असुन, त्यावर कारवाई (Action) करावी अशा प्रकारची तक्रार पोफाळी पोलीस स्टेशनला दिली होती. फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून सदर गुन्हा नोंद (Crime Record) करून पोफाळी पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून मृतक विवाहीतेच्या पतीस मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट रोजीअटक केली असून, पुढील तपास पोलीस स्टेशन पोफाळी करत आहेत.