Yawatmal crime :- हृदयाच्या आजाराने पिडीत विवाहितेस चारित्र्यावर संशय घेत विविध कुभांड रचून शारिरीक व मानसिक छळ केल्याबद्दल पोफाळी पोलीस स्टेशनला पती व सासर्याविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेस चारित्र्यावर संशय घेत विविध कुभांड रचून शारिरीक व मानसिक छळ
सदर प्रकरणात पिडीत विवाहितेने २६ सप्टेंबर रोजी पोफाळी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी आरोपी पती ज्ञानेश्वर लक्ष्मण धुमाळे (३७), सासरा लक्ष्मण नारायण धुमाळे दोन्ही रा. अंबाळी ता उमरखेड यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. घाणमुख येथील रामजी साखरे यांची मुलगी वर्षा हिचे सन २०११ मध्ये अंबाळी ता उमरखेड येथील ज्ञानेश्वर लक्ष्मण धुमाळे यांचे सोबत लग्न झाले. लग्नानंतर पाच ते सहा महिने सासरकडील मंडळी तिच्या सोबत चांगले राहिले, त्यानंतर क्षुल्लक कारणांवरून कुरबुरी सुरु झाली, तु दिसायला चांगली नाहीस तुला स्वयंपाक येत नाही , घरी बसून फुकटचे खाते, तुला दोन मुलीच आहेत.
माहेरहुन लोखंडी पेटी घेऊन ये म्हणून सासर्याच्या चिथावणीवरून नवर्याने केली मारहाण
आम्हाला मुलगा पाहिजे, शेजारच्या लोकांना बोलते म्हणून चारित्र्यावर संशय(Doubts about character), तुझे हृदयाचे ऑफरेशन झाले माहेरहुन ५० हजार आण, असे म्हणून सासरे लक्षणच्या चिथावणी वरून पती ज्ञानेश्वरने दारु पिऊन नेहमी मारहाण सुरु केली. २० सप्टेंबर रोजी पती ज्ञानेश्वर म्हणाला की, आपल्या मुली नांदेड येथे होस्टेलमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी माहेरहुन लोखंडी पेटी घेऊन ये म्हणून सासर्याच्या चिथावणीवरून नवर्याने मारहाण केली व सातत्याने शारिरीक व मानसिक छळ केला. त्यामुळे पिडीत होऊन विवाहितेने पोफाळी पोलीस स्टेशन (Police station)गाठले व पती व सासर्यांविरुद्ध पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.