हिंगोली (Hingoli Durga Festival) : जिल्ह्यात २२ सप्टेंबरला दुर्गादेवीची घटस्थापना करण्यात आली.या दरम्यान अनेक धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यात ४ ऑक्टोंबर रोजी सर्वाधिक २८८ दुर्गा देवींचे विसर्जन केले जाणार आहे. त्या निमित्ताने पोलिस प्रशासनाच्या वतीने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
२२ सप्टेंबरला सर्वत्र दुर्गा देवीची (Hingoli Durga Festival) घटस्थापना करण्यात आली. या निमित्ताने भाविकांनी घट स्थापना, गोंधळ, होमहवन, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रमही घेतले. त्याच बरोबर चिमुकल्यांच्या विविध स्पर्धा देखील संपन्न झाल्या.यासह अनेक दुर्गा देवी मंडळातर्फे विविध मंदिराची प्रतिकृती उभारून आर्कषक विद्युत रोषनाई केली होती. प्रत्येक दिवशी हजारो भाविकांनी दुर्गा देवींचे दर्शन घेतले. १ ऑक्टोंबर रोजी ५ ठिकाणी दुर्गा देवीचे विसर्जन झाले.
ज्यामध्ये औंढा नागनाथ येथे २ तर आखाडा बाळापूर, कुरूंदा, हट्टा पोलिस ठाणे हद्दीत प्रत्येकी १ ठिकाणी दुर्गा देवीचे विसर्जन झाले. आज २ ऑक्टोंबर रोजी २३५ ठिकाणी दुर्गा देवीचे विसर्जन होणार आहे. ज्यामध्ये पोलिस ठाणे निहाय हिंगोली शहरात १, बासंबा ९, हिंगोली ग्रामीण २ औंढा नागनाथ ५१, सेनगाव २०, नर्सी नामदेव ४, वसमत शहर ३१, वसमत ग्रामीण ६५, आखाडा बाळापूर ३, कुरूंदा १२, हट्टा ३७ अशा २३५ ठिकाणी दुर्गा देवीचे विसर्जन होणार आहे. ३ ऑक्टोबरला हिंगोली शहरात २२, कळमनुरी ७, बासंबा १४, हिंगोली ग्रामीण १३, औंढा नागनाथ ३५, सेनगाव ५५, नर्सी नामदेव १, वसमत शहर ३८, वसमत ग्रामीण ७, आखाडा बाळापूर ५७, कुरूंदा ३७, हट्टा १४ अशा २६२ ठिकाणी दुर्गा देवीचे विसर्जन होणार आहे. ४ ऑक्टोंबरला हिंगोली शहरात ३२, कळमनुरी ६०, बासंबा १४, हिंगोली ग्रामीण २८, औंढा नागनाथ ३, सेनगाव ९, गोरेगाव ४६, नर्सी नामदेव २६, वसमत ग्रामीण १, आखाडा बाळापूर ३१ अशा २८८ ठिकाणी दुर्गा देवीचे विसर्जन होणार आहे.त्यानंतर ५ ऑक्टोंबरला ७, ६ ऑक्टोंबरला १ अशा एकुण २९९ दुर्गा देवींचे विसर्जन केले जाणार आहे. या निमित्ताने नवदुर्गा महोत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणुकीचे देखील आयोजन केले आहे.