Warora :- वरोरा पोलिस स्टेशनच्या पथकाने एमडी ड्रग्जच्या (MD Drugs) बेकायदेशीर विक्रीच्या आरोपाखाली महेश नारायण खामणकर (२५) याला अटक केली. ही कारवाई दि.१३ ऑगस्ट रोजी करण्यात आली.
पोलिसांनी एकूण ८०,००० रुपये किमतीचा माल जप्त केला
पंचनामा तयार केल्यानंतर, पोलिसांनी देशपांडे लेआउट येथील स्वामी समर्थ मंदिरा जवळील त्याच्या निवासस्थानी छापा टाकला आणि २.९२० ग्रॅम एमडी ड्रग्ज (बाजारभाव १०,००० रुपये) आणि एक मोटारसायकल (किं. ७०,००० रुपये) जप्त केली. पोलिसांनी एकूण ८०,००० रुपये किमतीचा माल जप्त केला. ठाणेदार अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वाखाली गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष बकाल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शरद भस्मे, दिलीप सुर, संदीप वैद्य, दीपक मोडक, मनोज ठाकरे, महेश गावतुरे, विशाल राजूरकर, जाधव, तेजस्विनी गारघाटे यांचा समावेश होता. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेली औषधे रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. वरोरा पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे.