भंडारा/तुमसर (Peyjal Yojana) : महाराष्ट्र व मध्य प्रदेशाचा संयुक्त प्रकल्प बावनथडी असून येथील धरणात मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. परंतु नदीपात्र कोरडे पडले असून दोन्ही राज्याच्या सीमेतील पेजल योजना शेवटची घटका मोजत आहेत. (Peyjal Yojana) धरणातील पाणीसाठ्यावर मध्यप्रदेश शासनाचे नियंत्रण आहे. बालाघाट येथील जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानंतरच नदीपात्रात पाण्याच्या विसर्ग सुरू होणार असल्याची माहिती आहे. त्याकरिता मध्यप्रदेशातील पठार संघर्ष समितीने दोन दिवसापूर्वी बालाघाट येथील जिल्हाधिकार्यांना साखळे घातले होते. येथे धरण उशाला व ओरड घशाला अशी अवस्था निर्माण झाली आहे.
तुमसर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर सीतेकसा येथे बावनथडी प्रकल्पाचे धरण आहे. या (Peyjal Yojana) धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून दोन्ही राज्यातील शेती सिंचनाकरिता पाण्याच्या विसर्ग सध्या सुरू आहे. परंतु बावनथडी नदीचे पात्र संपूर्ण कोरडे पडले आहे. मागील दीड महिन्यांपासून नदीपात्रात पाण्याच्या एकही थेंब शिल्लक नाही. तसेच महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेतून बावनथडी नदी वाहते. दोन्ही राज्याच्या सीमेवर लोकवस्ती असून सुमारे ५० ते ६० गावे आहेत. दोन्ही राज्याच्या सीमेत गावातील पेयजल योजना कार्यान्वित आहेत.
परंतु सध्या या (Peyjal Yojana) पेजल योजना संकटात सापडल्या असून शेवटची घटका मोजत आहेत. त्यामुळे नदी काठावरील गावात जलसंकट निर्माण झाले आहे. विहिरींनी तळ गाठले आहे. नदीपात्रात पाणी नसल्याने विहिरींची पातळी ही खोल गेली आहे. आता येथील नागरिकांना केवळ विहिरीवरच आपली तहान भागवण्याची वेळ आली आहे. येथील नागरिकांकडे गुरढोर मोठ्या प्रमाणात असून त्यांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे.
धरणातील पाण्यावर मध्यप्रदेशाचे नियंत्रण
महाराष्ट्र मध्य प्रदेशाचे हे संयुक्त प्रकल्प जरी असले तरी (Peyjal Yojana) धरणातील पाणीसाठावर मध्य प्रदेशाचे नियंत्रण असून बालाघाट येथील जिल्हाधिकार्यांनी आदेश दिल्यानंतरच प्रकल्प अधिकारी येथे पाण्याच्या विसर्ग करतात. भंडारा जिल्हाधिकारी व बालाघाट येथील जिल्हाधिकारी येथे पाणी विसर्ग करण्याकरिता संयुक्त निर्णय घेतात.
यामुळे मध्यप्रदेशातील बावनथडी नदी काठावरील पठार संघर्ष समिती ने दोन दिवसापूर्वी बालाघाट येथे जिल्हाधिकार्यांना बावनथडी नदी पात्रात धरणातून पाणी विसर्ग करण्याकरिता साकडे घातले होते. परंतु अजून पर्यंत (Peyjal Yojana) पाणी विसर्ग करण्याच्या आदेश बालाघाट जिल्हाधिकार्यांनी दिला नाही. तुमसर तालुक्यातील बावनथडी नदीच्या काठावरील गावातही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील नागरिकांमध्ये सध्या असंतोष दिसत आहे. येथील जिल्हाधिकार्यांनी येथे दखल घेण्याची गरज आहे.