सायंकाळपर्यंत मृतदेह लागले नाही हाती
चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतील घटना
गडचिरोली (Medical students Death) : स्थानीक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षतील तिन विद्यार्थ्यांना गडचिरोली- चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीच्या पुलाखालील पाण्यात जलसमाधी मिळाल्याची घटना आज १० मे रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. (Medical students Death) पार्थ बाळासाहेब जाधव (२०) शिर्डी,गोपाळ गणेश साखरे (२०) बुलढाणा,स्वप्नील उद्भवसिंग शिरे (२०) संभाजीनगर अशी जलसमाधी मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास सुट्टया लागल्या आहेत. जवळपास सर्व विद्यार्थी आपआपल्या गावी गेले आहेत. घटनेतील विद्यार्थी चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहत होते. आज ७ ते ८ विद्यार्थी वैनगंगा नदीच्या पात्रात व्हॉलीबॉल खेळण्यासाठी गेले होते.
चंद्रपूर -गडचिरोली महामार्गावरील व्याहाड बुज. जवळील वैनगंगा नदीच्या पुलाखाली आज मेडिकल कॉलेज गडचिरोली येथील गोपाल गणेश साखरे , पार्थ बाळासाहेब जाधव , स्वप्निल उद्धवसिंग शिरे , शिवम श्रीधर जायभाई , सार्थक राजेश पाठक , सुजित धनाजी देशमुख हे विद्यार्थी बॉलीबॉल खेळत होते. दरम्यान बॉल पाण्यात गेल्याने ४ विद्यार्थी पाण्यात उतरले. मात्र तिघे जण पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप पुलरवार हे आपल्या चमूसह घटनास्थळी पोहोचले. सदर (Medical students Death) तीनही युवक हे गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालात एमबीबीएसच्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होते.
या (Medical students Death) युवकांना पाण्याबाहेर काढण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न आपदा ग्रुप व पोलीस विभाग करीत होते. मात्र रात्री पर्यंत त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले नव्हते. विशेष म्हणजे यापूर्वीही महाशिवरात्रीच्या दिवशी याच जागेवर चंद्रपूर येथील ३ बहिणींचा पोहत असतांना बुडून मृत्यू झाला होता, हे विशेष!