देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Zilla Parishad School) : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची (Zilla Parishad School) नवीन शाळा व्यवस्थापक समिती निवड २४ ऑगस्ट रोजी घेण्यात आली . मात्र अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड ही ईश्वर चिठ्ठी व मतदानाद्वारे मोठया अटीतटी मध्ये पार पडली.
चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथे वर्ग १ ते ५ ची पटसंख्या १७६ असून ८ शिक्षक कार्यरत आहे . त्यामध्ये वर्ग ३ रा ,वर्ग ४ था आणि वर्ग ५ वा या वर्गाच्या दोन दोन तुकड्या आहेत . शिक्षण विभागाच्या नियमानुसार शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे मुख्याध्यापक परीहार यांच्या अध्यक्षतेखाली शाळा समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. समितीची निवड होणार म्हणून अनेक पालकांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी जुळवा जुळव केली होती . मात्र शांततेत (Zilla Parishad School) समिती स्थापन व्हावी म्हणून (Zilla Parishad School) शाळा प्रशासनाने व्यवस्थित नियमानुसार नियोजन केले होते . सभेला सूरवात होताच पालकांनी गर्दी केली हे पाहता सर्व शिक्षकांनी आप आपल्या विद्यार्थांच्या पालकांना वर्ग खोलीत बोलावून घेतले . आणि निवडीचे निकष समाजावून सांगितले परंतू पालका मध्ये एकमत झाले नाही आणि एकमेकात चढाओढ व स्पर्धा सुरू झाली त्यामुळे वर्ग शिक्षकाला नाइलाजास्व पालकात मतदान घ्यावे लागले . आठ वर्गामधून आठ सदस्य यांची निवड करण्यात आली.
निवडलेल्या आठ सदस्या मधून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली . त्यामध्ये अध्यक्ष पदासाठी संदिप चेके , रामदास पडघान, सय्यद मुस्ताक सय्यद इंसा , विलास उचाळ असे एकून चार उमेदवार रिंगणात उतरले , आणि उपाध्यक्ष पदासाठी ज्ञानेश्वर तोडे , संदिप सुरुषे असे दोन उमेदवार रिंगणात होते . त्या मध्ये अध्यक्ष पदासाठी रामदास पडघान याना सर्वात जास्त मते मिळाली असल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदासाठी दोघांनाही समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी नुसार उपाध्यक्षपदी संदिप सुरुषे यांची नावाची घोषणा झाली. त्यामुळे मतदाना द्वारे अध्यक्षपदी रामरास पडघान तर इश्वर चिठ्ठीनुसार उपाध्यक्ष पदी संदिप सुरुषे याची निवड झाल्याने उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करीत आनंद साजरा केला.
या (Zilla Parishad School) निवडीसाठी शाळेचे मुख्याध्यापक व्ही पी परिहार , संजय फदाट , पि एस वायाळ , रामदास मापारी, एन पी घुसळकर , डि जे खाडे , संतोष पडघान ,यांनी मोलाचे सहकार्य केले. निवडीची घोषणा होताच नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा गावकऱ्यांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.