आग नियंत्रणात; मोठे नुकसान टळले
भंडारा (Meter Fire) : शहरातील बजरंग सुपरस्टोर्समध्ये मीटर जळाल्याने आगीचा भडका उडाल्याची घटना सोमवार दि.९ जून रोजी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने अग्निशामक वाहन वेळीच पोहोचल्याने (Meter Fire) आग नियंत्रणात आणली गेली. त्यामुळे मोठे नुकसान टळले.
तकीया वॉर्डातील ऐन मुख्य मार्गावर बजरंग सुपरस्टोर्स आहे. इमारतीच्या बाजूच्या गल्लीत भिंतीवर लावलेल्या मीटरने सोमवारी सायंकाळी अचानक पेट घेतला. या ठिकाणी अडगळीचे साहित्य व टायर ठेवले होते. त्यामुळे (Meter Fire) आगीने लगेच पेट घेतला. त्यामुळे मोठा भडका उडून सर्वत्र धुराचे लोट निघू लागले. घटनेची माहिती मिळताच भंडारा अग्निशामक दलाचे पथक वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने ५ मिनिटात ही आग आटोक्यात आणली.
मात्र टायर व साहित्य पेटल्याने सर्वत्र धूर पसरला होता. तकिया वॉर्डात विजेचे खांब ऐन रोडवर आहेत. त्यामुळे आवागमन करणार्या अवजड वाहनांचा सर्व्हिस वायरला धक्का लागल्याने स्पार्किंग होऊन या मीटरने पेट घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. रोडवरील खांब दुर्घटनेस कारणीभूत ठरत असल्याचा आरोपही यावेळी नागरिकांनी केला. या (Meter Fire) दुकानात किराणा व गृहपयोगी साहित्य भरले असून आग लवकर नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला.